आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या स्वप्नांची आणि आईच्या अट्टाहासाची आगळी-वेगळी कहाणी 'जावई विकत घेणे आहे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच तिच्या लग्नाची तयारी केली जाते, तिच्या सासरबद्दलची स्वप्न मनात बाळगली जातात. काळ कितीही पुढे गेला आणि समाज कितीही बदलला तरी लग्नानंतर मुलगी माहेरचा उंबरा ओलांडून सासरच्या उंब-यावरचं माप ओलांडणार ही परंपरा कायमच आहे. लहानपणापासून लाडात वाढवलेल्या, जिच्या चेह-यावर हसू येण्यासाठी तिचे सगळे हट्ट पुरवलेल्या लाडक्या लेकीला असं एका क्षणात दुस-यांवर सोपवणं हे तसं सोपं नाही. जर लहानपणापासून मुलीला ती म्हणेल त्या सगळ्या गोष्टी चुटकीसरशी घरातच आणून दिल्या तर मग नवरा पण का नको... असाच विचार आहे वीणा प्रधानचा.. आणि म्हणूनच तिला आपल्या लाडक्या प्रांजलसाठी नवरा हवाय तो घरजावई म्हणून.
झी मराठी वाहिनीवर वीणा प्रधानच्या अजब इच्छेची ही कथा बघायला मिळणार आहे “जावई विकत घेणे आहे” या मालिकेमधून. आजापासून (3 मार्च) दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. ही मालिका बघायला मिळणार आहे.
काय आहे या मालिकेची कथा, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...