आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलेंडरवर हॉट रुपात अवतरल्या मराठी तारका, पाहा ग्लॅमरस PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी टॉकीजनं 2014 हे कॅलेंडर नुकतंच लाँच केलं. हे कॅलेंडर चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्व पडद्यामागील कलावंतांना समर्पित करण्यात आलं आहे. पडद्यामागील शिल्पकारांना, त्यांच्या मेहनतीला दाद मिळावी, ही झी टॉकीजची मनिषा त्यांनी कॅलेंडरच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली आहे. या कॅलेंडरचे प्रकाशन नुकतेच अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते करण्यात आले.
निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, गायक छायाचित्रणकार, कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, संकलन, अँक्शन मास्टर अशा अनेक कल्पक हातांमधून एक दर्जेदार कलाकृती आकारास येत असते. त्यांच्या या अमुल्य योगदानाची दखल झी टॉकीजच्या 2014च्या कॅलेंडरमध्ये घेण्यात आली आहे.
अभिनेत्री गिरीजा जोशी, तेजस्विनी लोणारी, प्रिया बापट, पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी श्रिया पिळगावकर, पूर्वा पवार, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे, शिबानी दांडेकर, नेहा पेंडसे या अभिनेत्रींनी मराठी सिनेसौंदर्याच्या शिल्पकारांना मानाचा मुजरा दिला आहे. या अभिनेत्रींचे हे ग्लॅमरस रुप आपल्या कॅमे-यात टिपले आहे प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या कॅलेंडरवर अवतरलेल्या या मराठी तारकांची खास झलक दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा झी टॉकीज 2014च्या कॅलेंडरची खास झलक....