आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zee Talkies Calendar On 100 Yrs Of Indian Cinema

PHOTOS : दिवंगत मराठी कलावंतांना झी टॉकीजची कॅलेंडररुपी मानवंदना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटांच्या शताब्दीनिमित्त झी टॉकीजने एक आगळीवेगळी भेट चित्रपट रसिकांना दिली आहे. मराठी चित्रपटांमध्ये मोलाची कामगिरी बजावणा-या दिवगंत कलावंतांना झी टॉकीजने आकर्षक कॅलेंडरच्या रुपातून एक आगळीवेगळी मानवंदना दिली आहे.

भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, सुबोध भावे, संजय नार्वेकर, मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, उर्मिला कानेटकर आणि उपेंद्र लिमये या आजच्या प्रसिद्ध कलाकारांना दुर्गा खोटे, शांता आपटे, चंद्रकांत, दादा कोंडके, राजा गोसावी, डॉ. काशीनाथ घाणेकर, अरुण सरनाईक, जयश्री गडकर, रंजना, स्मिता पाटील, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या रुपात या कॅलेंडरवर दाखवण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या झी गौरव पुरस्कार 2013च्या नामांकन सोहळ्यात मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले.

प्रसिद्ध फोटोग्राफर भरत पवार यांनी या कलाकारांच्या विविध छटा आपल्या कॅमे-यात बंदिस्त केल्या आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा झी टॉकीजच्या सेलिब्रिटी कॅलेंडरची खास झलक...