मुंबई - 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या लोकप्रिय विनोदी शोच्या सेटवर अलीकडेच विनोदाऐवजी भांडणाचा आवाज घुमला. होय, बातमी अगदी खरी आहे. झाले असे, की 'द एक्सपोज' या आगामी सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेत असलेल्या अभिनेत्री सोनाली राउत आणि जोय अफरोज (मिस इंडिया 2013 रनर अप) यांच्यात 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर कडाक्याचे भांडण झाले. त्यांच्यातील भांडण एवढे विकोपाला गेले, की जोयाने सोनालीच्या कानशिलात लगावली.
गायक-अभिनेता हिमेश रेशमिया या दोघींसह आपल्या आगामी 'द एक्सपोज' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने कपिलच्या शोमध्ये आला होता.
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, सिनेमाच्या शुटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच सोनाली आणि जोया यांच्यात कॅटफाइटला सुरुवात झाली. त्यांच्यात कधीच पटले नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'कॉमेडी नाइट्स'च्या सेटवर दाखल झाल्यानंतर मेकअप व्हॅनमध्ये सोनाली आणि जोया यांचा सामना झाला. यावेळी सोनालीने जोयाला ताकिद दिली, की येथे नीट राहा, नाही तर तुला थोबाडीत मारेन. हे ऐकताच जोयाने सोनालीला जोरात थापड मारली. हे बघून हिमेशने त्यांच्यात मध्यस्थी केली आणि दोघींना वेगळे केले. हिमेशने मध्यस्थी केली नसती, तर त्यांच्यातील भांडण आणखीन वाढण्याची शक्यता होती.
'द एक्सपोज' हा सिनेमा 60 आणि 70च्या दशकातील सिनेमांपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे. सिनेमात हिमेश रेशमिया, सोनाली राउत आणि जोया अफरोज यांच्यासह हनी सिंह आणि इरफान खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिमेश या सिनेमाचा निर्मातासुद्धा आहे. येत्या 23 मे रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
नोट - वरील छायाचित्र सिनेमातील एका दृश्यातील आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'द एक्सपोज' या सिनेमाची काही छायाचित्रे...