आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zoya Akhtar Started Her Career From ‘Kamasutra’

'कामसूत्र'मध्ये अभिनेत्री म्हणून झळकलेली झोया अख्तर आज आहे प्रसिद्ध दिग्दर्शिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कामसूत्र'मधील एका दृश्यात झोया अख्तर)
मुंबई - 'लक बाय चान्स' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' यांसारख्या हिट सिनेमांचे दिग्दर्शन करणारी बॉलिवूडची यशस्वी दिग्दर्शिका झोया अख्तरने मंगळवारी आपल्या आगामी 'दिल धडकने दो'चा फस्ट लूक रिलीज केला. झोयाने दिग्दर्शिका म्हणून नव्हे तर अभिनेत्रीच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली होती, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. 1997 मध्ये रिलीज झालेल्या रेखा स्टारर 'कामसूत्र : टेल ऑफ लव्ह' या सिनेमात झोयाने छोटेखानी भूमिका साकारली होती. हा सिनेमा मीरा नायर यांनी दिग्दर्शित केला होता. सध्या झोया यूरोपमध्ये आपला आगामी महत्त्वकांक्षी सिनेमा 'दिल धडकने दो'चे शूटिंग पूर्ण करत आहे.
जावेद अख्तर आणि हनी इराणीची आहे मुलगी...
14 ऑक्टोबर 1972 रोजी जन्मलेली झोया अख्तर प्रसिद्ध लेखर जावेद अख्तर आणि हनी इराणी यांची मुलगी आहे. झोयाचा भाऊ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक फरहान अख्तर आहे. झोयाने सेंट झेविअर कॉलेज ऑफ आर्ट्समधून बॅचलर डिग्री घेतली आहे. त्यानंतर झोयाने फिल्म प्रॉडक्शनचे शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीच्या फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.
पेप्सी आणि फाइनओलेक्समध्येही केले काम...
झोयाने आपल्या करिअरची सुरुवातीला पेप्सी आणि फाइनओलेक्ससाठी जाहिराती तयार केल्या होत्या. त्यानंतर झोयाने तिचा भाऊ फरहान अख्तरच्या 'दिल चाहता है' या सिनेमासाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले होते. याशिवाय झोयाने 'दिल चाहता है' आणि 'लक्ष्य' या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणूनसुद्धा काम केले होते.
2009मध्ये केले होते पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शन...
झोया अख्तरने 2009 मध्ये 'लक बाय चान्स' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर 2011 साली 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमाचे दिग्दर्शन केले. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 2013 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झोयाने अनुराग कश्यप, करण जोहर आणि दिबाकर बॅनर्जी यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत मिळून 'बॉम्बे टॉकीज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमातील चारही कथांचे समीक्षकांनी कौतुक केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा झोया अख्तरची निवडक छायाचित्रे...