सॅमसंगने आणला गॅलेक्सी / सॅमसंगने आणला गॅलेक्सी एस ३, आता इंटरनेटशिवाय पाठवा डेटा

May 04,2012 01:21:54 PM IST

नवी दिल्ली- मोबाईलच्या मार्केटमध्ये १४ वर्षाची नोकियाची मक्तेदारी संपुष्टात आणल्यानंतर सॅमसंगने गुरुवारी आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एस-३ हा फोन लॉन्च केला. गॅलेक्सी एस-३ या फोनबाबत इंटरनेटवरुन बाजारात चर्चा गरम झाली आहे. भारतात हे मॉडेल जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल. याची किमत सुमारे ३८ हजार रुपये असेल. मात्र हा फोन ब्रिटनमध्ये २९ मेपासून तर त्यानंतर अमेरिकेत विक्रीस ठेवण्यात येणार आहे.

गॅलेक्सी एस-३च्या खास फिचर्सवर एक नजर-
- 1280x720 पिक्सल रिझॉल्यूशन असलेला हा फोन ४.८ इंच एचडी सुपर अमोल्ड डिस्प्ले स्क्रीनचा आहे.
- ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, १.९ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- रियर कॅमेरा आयफोन ४ एस आणि एचटीसी वन एक्सला टक्कर देत आहे. गॅलेक्सी एस-३चा कॅमेरा हसणे समजतो तसेच चेहराही ओळखू शकतो.
- या स्मार्टफोनचे वजन १३३ ग्रॅम आहे. तर त्यांची जाडी ८.६ मिलीमीटर आहे.
- एंड्राईड ४.० चे लेटेस्ट व्हर्जन
- क्वॅडकोर मायक्रोप्रोसेसर
-१ जीबी रॅमची मेमरी
-व्हाईस कमांड सुविधा
- फोनची मागची बाजू सिरॅमिक धातूऐवजी प्लॅस्टिकची बनविली आहे
- एस बीमची सुविधा. ज्यामुळे १ जीबीची फाईल दुस-या कोणत्याही गॅलेक्सी एस-३ मध्ये इंटरनेट व वाय-फायशिवाय पाठवता येऊ शकते.
-आयफोनमधील पसंतीला आलेले फ्लिपबोर्ड हे एप्लीकेशन बसविण्यात आले आहे
- या फोनद्वारे ग्राहकांना ५० जीबीचे क्लाऊड स्टोरेज ड्रॉपबॉक्स दिले जाणार आहे
आपले मत- काय सॅमसंग गॅलेक्सी एस-३ हा स्मार्टफोन सगळ्यात लेटेस्ट आहे? काय तुम्ही याला वापरु इच्छिता. तुमच्या मते यातील कोणती सुविधा खास आहे. आपले मत खालील कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.

X