आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिनोवोने लॉंन्‍च केला लीफोन K800

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉम्‍प्‍युटर बनवण्‍यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी लिनोवोने मोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्‍यांनी ली-फोन K800 या नावाने बाजारात लॉन्‍च केला आहे. या फोनची घोषणा जानेवारी महिन्‍यात करण्‍यात आली होती. त्‍यानंतरच्‍या दुस-या तिमाहीत लॉन्‍च होण्‍याचा अंदाज लावण्‍यात आला होता.
पॉवलफुल्‍ल ऑपरेटींग सिस्‍टमशिवाय या स्‍मार्ट फोनमध्‍ये अनेक युजर फ्रेंडली फीचर्स उपलब्‍ध आहेत. यामध्‍ये 4.5 इंचची एलसीडी कॅपेसेटिव्‍ह टच स्‍क्रीन आणि त्‍याचे रिझॉल्‍युशन 1280x720 पिक्‍सल इतके आहे. 16 जीबी इंटर्नल मेमरी शिवाय चांगल्‍या प्रोसेसिंगसाठी 1.6 गीगाहटर्जचे सीपाय आहे. त्‍याची 1 जीबी RAM इतकी सिस्‍टीम मेमरी आहे.
लिनोवो स्‍मार्टफोनमध्‍ये 8 मेगापिक्‍सलचा कॅमेरा आहे. त्‍याच्‍याद्वारे युजरला चांगल्‍या गुणवत्तेचा फोटो आणि व्हिडिओ तयार करता येऊ शकतो. रिअर कॅमेरामध्‍ये ड्युल एलईडी ऑप्‍शनसुद्धा आहे. व्हिडिओ चॅटिंगसाठी यामध्‍ये 1.3 मेगापिक्‍सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे.
336 तासापर्यंत फोनची बॅटरी चालते. त्‍याशिवाय या फोनमध्‍ये सलग 8 तास बोलता येते. लिनोवोच्‍या याफोनमध्‍ये अ‍ॅंड्राएड 2.3 ऑपरेटिंग सिस्‍टम आहे. 802.11 वायफाय फोन सुविधा उपलब्‍ध आहे. लिनोवोने या फोनची किंमत 27 हजाराच्‍या आसपास ठेवली आहे.
वोडाफोनचा नवा अ‍ँड्राएड स्‍मार्टफोन फक्‍त 7 हजारात
नोकियाला पछाडून सॅमसंग बनली नं. 1 मोबाईल विक्रेती कंपनी
नोकियाने लॉन्‍च केला सर्वात स्‍वस्‍त मोबाईल