आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SAMSUNG NO.1; 2013 मध्ये विकले गेले एक अब्ज स्मार्टफोन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कोरियन मोबाइल कंपनी सॅमसंगने 2013 मध्ये सर्वाधिक स्मार्टफोन विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सॅमसंग कंपनी ही सर्वाधिक फोन विक्रेता कंपनी ठरली आहे. गेल्या वर्षात सुमारे एक अब्ज स्मार्टफोनची विक्री झाली आहे. यात संमसंग कंपनीच्या फोनचा वाटा सर्वाधिक आहे.

या क्षेत्रातील आघाडीची संशोधन संस्था आयडीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात 38 टक्के अधिक स्मार्टफोनची विक्री झाली. भारत आणि चीन सारख्या देशात स्वस्त फोनची मागणी असताना सॅमसंगने स्मार्टफोन विक्रीत नवा विक्रम प्रस्तापित केल्याचेही आयडीसीने म्हटले आहे.
2013 साली संपूर्ण जगात एकूण 100.42 कोटी स्मार्टफोनची ‍विक्री झाली. त्यामुळे 2012 च्या तुलनेत गेल्या वर्षात एकूण फोनच्या विक्रीत 38 टक्के वाढ झाली. 2012 साली ही आकडेवारी एकूण 72.53 कोटी होती.
सॅमसंगने 31.39 कोटी, 'अ‍ॅपल'ने 15.34 कोटी तर 'हुआवेइ'ने 4.88 कोटी स्मार्टफोनची विक्री केली. गॅझेट मार्केटमधील भागीदारीचा आढावा घेतला असता 'एजी' चौथ्या तर 'लिनोवो' कंपनी पाचव्या स्थानावर आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'सॅमसंग' झाला अधिक स्मार्ट...