आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल गेट्स यांच्या यशस्वी जीवनाचे दहा धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स दिवसातून 100 ई-मेल स्वत: चेक करतात. त्यामुळेच त्यांना समजते की, लोक आपल्या कोणत्या कार्याचे कौतुक करतात आणि कसली तक्रार करतात. या तंत्राचा वापर करून आपणही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळवू शकतो. वाचा गेट्स यांच्या जीवनातील दहा महत्त्वाचे धडे...


धडा 1- आपल्या सहकार्‍याचे कौतुक करा.
मोठ्या संस्थेत कर्मचार्‍यांचे कौतुक केले पाहिजे. बिल गेट्स यांनी कर्मचार्‍यांची काळजी घेण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. डेव्हलपर्सच्या खासगी कार्यालयात किंवा खूप व्यस्त असलेल्या ठिकाणीही त्याचा वापर होतो.
धडा 2- डिव्हाइड अँड रूल पॉलिसीचा विरोध
‘फूट पाडा आणि राज्य करा’ या पॉलिसीच्या विरोधात ते कायम राहिले. ही एक मोठी समस्या असल्याचे त्यांचे मत होते. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी या उपायाचा अवलंब करायला त्यांचा विरोध असायचा.
धडा 3- समस्यांमध्ये गुरफटल्यास यश कठीण
कठीण परिस्थितीत गुरफटून राहिल्यास यशाची खात्री मिळत नाही. हार्वर्डमध्ये दिलेल्या एका व्याख्यानात यासंदर्भातील एक गोष्ट त्यांनी मांडली. त्यात सांगितले होते की, रेडक्लिप हे राहण्यासाठी सर्वात चांगले ठिकाण आहे. त्यात महिला जास्त आणि बहुतांश मुले विज्ञानाने प्रभावित झालेली असतात. हा संयोग अजब वाटत असला तरी बिल गेट्स त्यावर ठाम असायचे.
धडा 4- आयटी इंडस्ट्रीमधील नवीन परिभाषा
मायक्रोसॉफ्टचे यश हे कमी किमतीच्या उत्पादनांपासून सुरू होते. त्यानंतर सातत्याने त्यात सुधारणा केली गेली. त्यानंतरच आयटी इंडस्ट्रीमध्ये नवीन परिभाषा तयार झाली.
धडा 5- फीडबॅक सर्वात अवघड
गेट्स समजतात की, तुमचा तक्रारदार ग्राहकच तुम्हाला नवीन शिकण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. जर फीडबॅकमध्ये लोकांनी सांगितले की, तुम्ही म्हणतात ते चुकीचे आहे, तर ते तुमच्यासाठी सर्वाधिक मूल्यवान आहे.
धडा 6- टेक्नॉलॉजी आणि बिझनेस सोबत हवे.
आम्ही जगात नॉलेज वर्कर आहोत. त्यात माहिती व तंत्रज्ञान सर्वात अव्वल आहे. मागे वळून 30 वर्षांपूर्वीची मायक्रोसॉफ्ट पाहिल्यास खूप आनंद होतो. तेव्हा कामाला सुरुवात झाली होती आणि आपण पुढे कसे जावे व काय बदल करावे, याचा विचार करत होतो. आता आम्ही डिजिटल वर्कच्या जवळ आले आहोत.
धडा 7- समस्या ओळखणे शिका.
जर तुम्ही समस्या समजून घेतली तरच ती तुम्हाला सोडवता येईल. समस्या समजल्यावरही ती सोडवणे सोपे काम नाही. त्यामुळे समस्येवर फोकस करणे महत्त्वाचे आहे.
धडा 8- यश सेलिब्रेट करा; अपयशातून धडा घ्या.
यशाचे सेलिब्रेशन झाले पाहिजे; परंतु त्याच वेळी अपयशातून नवीन शिकलेही पाहिजे. एकच गोष्ट वारंवार होणे अयोग्य आहे.
धडा 9- तंत्रज्ञान : एक उपकरण
मेंदूचे संतुलन कायम ठेवले पाहिजे. कुठेही ढील सुटायला नको. मुलांनी काम करावे आणि तुम्ही त्यांचे प्रेरणास्थान व्हावे, यासाठी शिक्षक सर्वात जास्त महत्त्वाचे असतात.
धडा 10- अक्षमता वारंवार येऊ देऊ नका.
काही वस्तू वास्तवात वेगळ्या असतात. त्यातून नवीन समस्या तयार होऊन जातात. कोणत्याही व्यवसायात वापरले जाणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर पुरेपूर केला पाहिजे. तेथे ऑटोमेशन लागू झाल्यास कामकाजाची क्षमता वाढते.