आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 10 प्रकारची गृहकर्जे ज्‍यांची असावी माहिती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍वत:चे टूमदार घर किंवा आलिशान प्लॅट असावा, असे अनेकांचे स्‍वप्‍न असते. आजकाल गृहकर्जाशिवाय हे स्‍वप्‍न पूर्ण होण्‍याची शाश्‍वती नाही. घराचे स्‍वप्‍न पाहणा-यांसाठी गृहकर्जाचे बँका आणि वित्तीय संस्‍थांकडून पुढील पर्याय उपलब्‍ध आहेत.

देशात अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न लोकप्रिय आणि आकर्षक गृहकर्ज योजनांमुळे शक्य झाले आहे. गेल्या दशकभरात गृहकर्जाची मागणी सातत्याने वाढत आहे. स्वत:चे घर असावे अशी इच्छा असणार्‍या हजारो लोकांकडून गृहकर्जाचे अर्ज दाखल केले जातात. गृहकर्जाचा आणखी एक फायदा म्हणजे करातून मिळणारी सूट आणि इतर फायदे. बँका आणि वित्तीय कंपन्या घर खरेदीसोबत त्याच्याशी संबंधित इतर कारणांसाठीसुद्धा कर्ज देतात. गृहकर्ज बाजारात ग्राहकांच्या गरजांनुसार अनेक प्रकारच्या गृहकर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत. गृहकर्जातून बँका आणि वित्तीय संस्थांनासुद्धा मोठा फायदा होतो तसेच सुरक्षेची खात्री असल्याने अशा प्रकारची कर्जे देण्यासाठी बँका, संस्था जास्त प्रयत्नशील असतात. सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्जपुरवठा करणारे विशेष सवलती जाहीर करतात. या सवलतीच्या साहाय्याने नवे ग्राहक जोडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी बँका सवलतीचा व्याजदर लावतात. म्हणून जर तुम्ही गृहकर्जाचा विचार करत असाल तर अशा सवलती आणि ऑफर्सची माहिती घेणे फायद्याचे ठरते.