आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांत देशातील श्रीमंतांची संख्या 10 पटींनी वाढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताच्या आर्थिक विकासाचा वेग भलेही काहीसा थंडावला असला तरी भविष्यातील आशेची किरणे आजच लख्खपणे दिसू लागली आहेत. येत्या दशकभरात भारतातील र्शीमंतांची संख्या 10 पटींनी वाढणार असल्याचे जगभरातील आर्थिक विश्लेषक आणि तज्ज्ञांचे अनुमान आहे.
काही दिवसांपूर्वी 'मुडीज' आणि 'फिच'सारख्या आर्थिक मानांकन देणार्‍या संस्थांनी भारताच्या आर्थिक विकासाबद्दल व्यक्त केलेल्या चिंतेतही दम नसल्याचे दिसून येत आहे. भारताच्या भविष्यातील आशेची किरणे ही एका अर्थाने काही उत्साहवर्धक आकडेवारीचा समुच्चय आहे.
उदा. आजमितीस कोट्यवधी लोकसंख्या खेडोपाडी राहत असूनही जगभरातील सर्वाधिक शहरीकरणाचा वेग असणार्‍यांपैकी भारत एक आहे. चीन वगळता जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वेगाने शहरीकरण होत आहे. सद्य:स्थितीत 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली भारतात 45 पेक्षा अधिक शहरे आहेत. दुसरीकडे इतकी लोकसंख्या असलेली अमेरिकेत फक्त 9 शहरे आहेत.
याचप्रमाणे भारतात सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीने चांगलाच वेग पकडला आहे. उदा. नजीकच्या काळात देशातील नव्या विमानतळांची निर्मिती ही अत्यंत उत्कृष्ट आणि आंतरराष्ट्रीय दर्जानुरूप करण्यात आली आहे. याचप्रमाणे दिल्ली, बंगळुरूसारख्या मेट्रो सिटीमधील मेट्रो रेल्वे या सर्वांचे लक्ष आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. गेल्या काही वर्षांत रस्ते, महामार्गांचे नेटवर्क जवळपास दुप्पट झाले आहे. इतकेच नव्हे, तर नवनव्या रस्तेबांधणीच्या योजना आखल्या जात असून काहींचे कामही सुरू झाले आहे.
भारताच्या भरभराटीवर लक्ष असलेल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक विकासाचा वेग थंडावला असला तरी याच्या निगडित गेल्या काही वर्षांतील 'डाटा' उत्साहवर्धक असल्याचा दिसतो. या काळात देशाचा आर्थिक विकासदर 7 टक्क्यांच्याही पुढे होता. जागतिक विकासदराच्या तुलनेत तो दुपटीपेक्षाही अधिक आहे.
आणखी एक आशादायक गोष्ट म्हणजे भारत हा हळूहळू चांगलाच मालदार देश होत चालला आहे. सध्या पाच कोटींपेक्षा अधिक भारतीयांचे खर्चण्याजोगे वार्षिक वेतन 4,200 डॉलर्स ते 21,000 डॉलर्स आहे. येत्या दहा वर्षांत र्शीमंत भारतीयांची संख्या जवळपास दहा पटींनी वाढेल. भारतात तरुणांची संख्या इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. ही एक आणखी आशादायक बाब. इतकेच नव्हे, तर देशातील तरुणाईस आजच्या अत्याधुनिक डिजिटल दुनियेची पुरेपूर महिती असून त्यांना उच्च शिक्षणाची आस आहे.