न्यूयॉर्क - फोर्ब्ज या प्रसिद्ध मासिकाने आशिया-पॅसिफिक भागातील ५० अव्वल कंपन्यांच्या यादीत भारतातील १२ कंपन्यांचा समावेश केला आहे. यात टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे.
वर्ष २००५ पासून जाहीर होत असलेल्या या फॅब्युलस ५० नावांच्या यादीत एचडीएफसीने आठव्यांदा, तर टीसीएसने सातव्यांदा स्थान मिळवले आहे. आयटी क्षेत्रातील देशाची चौथ्या क्रमांकाची कंपनी टेक महिंद्राने प्रथमच या यादीत स्थान पटकावले आहे. तर एफएमसीजी क्षेत्रातील आयटीसी यादीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. संख्येच्या दृष्टीने पाहलि्यास भारतातील १२ कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले असून चीनच्या १९ कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. फोर्ब्जच्या मते चीनमध्ये विकासाची गती मंदावली असल्याने चीनच्या कंपन्यांची संख्या गतवर्षीच्या २० वरून घटून १९ वर आली आहे. फोर्ब्जने चीननंतर भारताला दुसऱ्या क्रमांकाचे ग्रोथ इंिजन संबोधले आहे. या यादीत दक्षिण कोरियाच्या सहा, हाँगकाँगच्या तीन, तर जपान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूर व थायलंडच्या दोन-दोन कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. यात नऊ कंपन्यांसह आयटी क्षेत्राने
आपला दबदबा दाखवून दिला आहे.
फॅब्युलस ५० - भारतीय कंपन्या
टीसीएस, एचसीएल , एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, लुपिन, मदर्सन सूमी सिस्टिम्स, सन फार्मा, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, टायटन इंडस्ट्रीज.
निकष : ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल किंवा वार्षिक महसूल तीन अब्ज डॉलर (सुमारे १८२ अब्ज रुपये)आहे, अशा कंपन्यांचा फॅब्युलस ५० मध्ये समावेश करण्यात आला आहे.