तेरा वर्षाचा मुलगा / तेरा वर्षाचा मुलगा झाला करोडपती

agency

Jun 16,2011 08:52:02 PM IST

तेरा वर्ष हे वय खरेतर खेळण्याचे, बागडण्याचे. पण तुम्हाला अशा एका तेरा वर्षाच्या मुलांबाबात आम्ही सांगणार आहे की तो केवळ चर्चेत आला नाही तर त्याने एवढया लहान वयात करोडो रुपये कमावले आहेत. तर या पराक्रमी मुलाचे नाव आहे लॉरेंस रुक असे असून तो ब्रिटनमध्ये राहतो. तो चर्चेत येण्याचे व करोडो रुपये कमाविण्याचे कारण असे आहे की, त्याने असे एक मशिन बनविले आहे की समजा तुम्ही सुट्टीच्यानिमित्ताने बाहेर गेला आहे व लॉरेंसने बनवलेल्या मशिनमुळे चोरी होण्याची जवळजवळ शक्यता नाहीच. त्यामुळेच सध्या तो ब्रिटनमध्ये चर्चेत आला आहे.
सर्वसाधारणपणे चोर बंद घराचा दरवाजा पाहून किंवा घरातील बेल वाजवून घरात कोणी आहे का याचा अदांज घेतात. जर बेल वाजवून घरातून प्रतिसाद मिळाला नाही तर चोर समजतात घरात कोणीही नाही. पण लॉरेंसने नेमके याच्यावरच उपाय काढत एक अनोखे मशिन तयार केले आहे. या मशिनमुळे घरात कोणी आहे की नाही याचा अंदाज घेता येणार नाही.
लॉरेंसच्या बनविलेल्या या मशिनमुळे तुम्ही घरात नसताना चोरांनी किंवा कोणत्याही व्यक्तीने घराची बेल बाजवली तर थेट तुमच्या मोबाईलची रिंग वाजेल. तसेच त्यावेळी आपण जे बोलाल ते इंटरकॉममुळे दरवाजात उभ्या राहणाऱया व्यक्तीला तो ऐकू जाईल. त्यामुळे त्याला वाटेल की तुम्ही घरात आहात. तसेच या मशिनमध्ये मोबाईलचे सिम कार्ड बसविण्याची सोय आहे. त्यामुळे संदेशवहन होऊ शकते.
लॉरेंसने बनविलेल्या या मशिनला 'स्मार्ट बेल डिवाईस' असे नाव देण्यात आले असून, कॉमटेल या कंपनीने यापूर्वीच २० हजार मशिन बनवून विकल्या आहेत. तसेच अजून मशिनला मागणी आहे. त्यामुळे करारापोटी लॉरेंसला कंपनीने सुमारे ४१०,०६३ डॉलर एवढी रक्कम दिली आहे. ज्याची किंमत भारतीय चलनानुसार १.८४ कोटी रुपये होते. त्यामुळे खेळण्या-बागडण्याची वयात या पराक्रमी लॉरेंस रुक हा शाळकरी मुलगा करोडपती बनला आहे.

X
COMMENT