Home »Business »Business Special» 15 To 18 Percentage Growth In Information Technology In 2013

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यंदा १५-१८ टक्के वाढ होणार

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 16:53 PM IST

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यंदा १५-१८ टक्के वाढ होणार
पुणे- सोशल मीडिया, बिग डाटा, सॉफ्टवेअर आधारित डाटा सेंटर अशा दहा क्षेत्रात भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची २०१३ मध्ये १५-१८ टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज 'झिनोव्ह' या जागतिक सल्ला सेवा कंपनीने व्यक्त केला आहे.
माहिती तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवा यांच्या निर्यात बाजारपेठेचे चित्र संमिश्र असले तरी पाच हजार मोठ्या कंपन्या तसेच छोट्या आणि मध्यम आकाराच्या एक कोटी कंपन्याना या सेवांची गरज असल्याने ३० अब्ज डॉलरची उलाढाल करणारी ही बाजारपेठ यंदा किमान १५ टक्के दराने वाढेल. ज्या १० क्षेत्रांचा यात मोठा वाट असेल ती पुढीलप्रमाणे असतील
१-आयटी सोल्युशन सेलिंग
२-न्यू आयटी सोल्युशन ( भारतीय बाजारपेठेसाठी )
३-इमजिंग बाजारपेठेसाठी इनोव्हेशन
४-सॉफ्टवेअर आधारित डाटा सेंटर
५-चानेल पार्टनर क्षमता
६-डिजिटल मार्केटिंग
७-बिग डाटा
८-प्रशिक्षण आणि प्रमाणिकरण
९-सोशल मिडिया
१०-नव्या कंपन्या या दहा क्षेत्रांकडे नजर टाकल्यास बँकिंग आणि वित्त सेवा, उत्पादन उद्योग , दूरसंचार , दळणवळण सेवा, नव्याने उभारली जाणारी शहरे यामुळे आयटी आणि त्याच्याशी संबंधित सेवांना असलेली मागणी आणखी वाढेल असे झिनोव्हने म्हटले आहे.

Next Article

Recommended