आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 150 Km Metro Runing In Mumbai ; Agreement With Transport For Landan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईमध्ये 150 किमी मेट्रो रेल्वे धावणार ; ट्रान्सपोर्ट फॉर लंडन या कंपनीसमवेत करार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई व लगतच्या परिसरामध्ये 150 किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार केला असून लंडनमधील ट्रान्सपोर्ट फॉर लंडन या कंपनीसमवेत आज या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. भूमिगत मेट्रो उभारण्यामध्ये कंपनीचा अनुभव लक्षात घेता मुंबईमध्ये भूमिगत मेट्रो उभारण्यासाठी त्या कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. हा सामंजस्य करार करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ब्रिटनच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधी ग्रेगरी बार्कर आदी उपस्थित होते.

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून आज मुंबईत असून त्यांच्या समवेत हे शिष्टमंडळदेखील आले आहे. एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या कॅपिटल प्रोग्रामचे डायरेक्टर डेव्हिड वॅबोसो यांनी सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यामध्ये मोठ्या कंपन्यांमार्फत होत असलेल्या गुंतवणुकीमुळे महाराष्‍ट्र औद्योगिक विकासात पुढे आहे.


असा असेल प्रकल्प
एमएमआरडीएने शहरामध्ये 150 किमीच्या मेट्रो रेल्वे जाळ्याचा आराखडा तयार केला असून त्यामध्ये 146 किमी लांबीचे नऊ लाइन्सचे मेट्रो नेटवर्क उभारण्यात येईल. त्यात तीन मार्गांचे 33 किमीचे नेटवर्क हे भूमिगत असेल. भूमिगत मेट्रो उभारणीचा अनुभव एमएमआरडीएला नसल्याने या क्षेत्रातील अनुभवी अशा ट्रान्सपोर्ट फॉर लंडन कंपनीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे वाहतुकीत अत्याधुनिक बदल होतील, असा विश्वास एमएमआरडीए प्रशासनाला वाटतो.