आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Percent Hike In Bank Deposit, Swap Window Facility Increases This

बँकांच्या ठेवींमध्ये 17 टक्क्यांनी वाढ,स्वॅप खिडकी सुविधेमुळे ठेवीं वाढल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोठ्या प्रमाणावर निधी संकलन झाल्यामुळे यंदा 13 डिसेंबरपर्यंत बॅँकांमधील ठेवींचे प्रमाण वार्षिक आधारावर 17 टक्क्यांनी वाढले आहे. अनिवासी भारतीयांच्या विदेशी चलनातील ठेवींसाठी रिझर्व्ह बॅँकेने विशेष स्वॅप खिडकी
सुविधेमुळे ठेवींमध्ये वाढ होण्यास मदत झाली आहे.
रिझर्व्ह बॅँक फ इंडियाच्या पंधरवड्याच्या माहिती अहवालानुसार 13 डिसेंबरपर्यंत ठेवी 75,24,217 कोटी रुपयांवर गेल्या आहेत. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत 64,30,998 कोटी रुपयांचे ठेवी संकलन झाले होते.
अनिवासी भारतीयांच्या विदेशी चलनासाठी (बॅँक) रिझर्व्ह बॅँकेने सुरू केलेल्या विशेष खिडकी सुविधेमुळे ठेवींमध्ये वाढ होण्यास मदत झाल्याचे एका सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकेच्या खजिनदाराने सांगितले.
एफसीएनआर (बी) ठेवी ‘स्वॅप’ करण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने 4 सप्टेंबरला बॅँकांमध्ये विशेष सवलत खिडकी सुरू केली आहे. रुपयाच्या पडझडीला लगाम बसावा या उद्देशाने सुरू केलेली ही सुविधा 30 सप्टेंबरपर्यंत खुली होती. त्या काळात बॅँकांनी जवळपास 26 अब्ज डॉलरच्या एफसीएनआर (बी) ठेवी गोळा केल्या.
व्यावसायिक बॅँकांच्या कर्ज वृद्धीत वार्षिक आधारावर 15 टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 49,61,52 5 कोटी रुपयांवरून 57,01,328 कोटी रुपयांवर (13 डिसेंबरपर्यंत) गेली आहे. 2013- 14 या चालू आर्थिक वर्षात संपूर्ण बॅँकिंग प्रणालीतील कर्ज वृद्धी 15 ठक्के तर ठेवींमध्ये 14 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज रिझर्व्ह बॅँकेने व्यक्त केला आहे.