आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबरमध्ये नोकर्‍यांत हंगामी घट: नोकरी डॉट कॉम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये नोकर्‍यांच्या बाबतीत नरमाईचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन नोकर्‍यांचे प्रमाण हंगामी आधारावर १८ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.

नोकरी डॉट कॉम या नवीन नोकरी देणाऱ्या वेबसाइटचा नोकरी निर्देशांक ऑक्टोबरमध्ये १,५१८ वर आला असून सप्टेंबरच्या तुलनेत नवीन नोकऱ्या देण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी घसरले आहे. ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या वातावरणामुळे नवीन नाेकऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्या अगोदरच्या कालावधीतील सणासुदीच्या हंगामातही असाच कल राहिला असल्याचे इन्फोएज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हितेश ओबेरॉय यांनी सांगितले. नोकरी.कॉम या ऑनलाइन संकेतस्थळाची मालकी इन्फोएजकडे आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये मात्र नवीन नोकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक कल दिसून येणार आहे.

सर्वच क्षेत्रांत घसरण
विमा, औषध वगळता माहिती तंत्रज्ञान, बीपीओ या क्षेत्रांमधील नोकरीचे प्रमाण अनुक्रमे १६ आणि १७ टक्क्यांनी घटले आहे. बँका, वाहन, दूरसंचार, बांधकाम, अभियांत्रिकी क्षेत्रातही हाच कल आहे. कोलकाता, पुण्यापाठोपाठ दिल्ली, मुंबई यासह सर्व प्रमुख शहरांमधील नोकर्‍यांचे प्रमाण घटले आहे. त्यातही बँका, विमा आणि उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मागणीत घसरणीचा सूर आहे.