आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- ग्रामीण भागापर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बॅँक आणि सरकारचे सुरू असलेले प्रयत्न आणि त्याच्याच जोडीला देण्यात येणारे नवीन बँकिंग परवाने यामुळे बॅँकिंग क्षेत्रात नोकर्यांच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत. पुढील पाच ते दहा वर्षात या क्षेत्रात 20 लाख नवीन रोजगार नोकर्या निर्माण होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे पुढील काही वर्षांमध्ये राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील जवळपास अध्र्याहून अधिक मनुष्यबळ सेवा निवृत्त होणार आहे. त्यामुळे बॅँकांनाही नव्या प्रज्ञावान उमेदवारांची गरज भासणार आहे. परिणामी राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये नोकरभरतीला जास्त चालना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
‘रॅँडस्टॅँड इंडिया’ या मनुष्यबळ स्रोत सेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार येणार्या दशकात बॅँकिंग क्षेत्रात सात ते दहा लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. चालू वर्षात सर्वाधिक रोजगार देण्याच्या बाबतीत बॅँकिंग उद्योग अव्वलस्थानी असेल असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.
विद्यमान तसेच नवीन बॅँकांसह या क्षेत्रात होत असलेल्या विस्तारामुळे पुढील पाच वर्षातच 18 ते 20 लाख नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याचा अंदाज मणिपाल अकॅडमी ऑफ बॅँकिंगने व्यक्त केला आहे. बॅँका आणि त्याच्याशी निगडित क्षेत्रातही नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.
नवीन बॅँक परवाने येत्या सहा महिन्यांमध्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात बॅँकिंग क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी निर्माण होण्याची शक्यता रॅँडस्टॅडचे भारत आणि र्शीलंकेतील सीईओ मूर्ती उप्पालुरी यांनी व्यक्त केला.
छोट्या शहरात जास्त मागणी
>द्वितीय, तृतीय, चतुर्थ र्शेणीतील शहरात बॅँका आल्याने व्यवसाय प्रतिनिधी, विक्री अधिकारी, अन्य व्यावसायिकांची मागणी वाढणार.
>या शहरांमधून नोकरभरतीचे प्रयत्न सुरू झाल्याने कर्मचारी उत्पादकतेत सुधारणा.
सर्वात जास्त रोजगाराच्या संधी
>मुंबई, चेन्नई, एनसीआर विभाग
>स्थापन होणार्या नवीन बॅँकांच्या शाखांमध्ये ऑपरेटर, आयटी, रिस्क मॅनेजमेंट, कम्प्लायन्स विभागातील
कर्मचार्यांची गरज वाढणार.
>राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये प्रवेश पातळीवरील अधिकार्यांपासून लिपिक वर्गापर्यंतच्या संधी.
>विद्यमान बॅँकांना ग्राहकांशी संपर्क किंवा ग्राहक सेवा देणार्या उमेदवारांची गरज भासणार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.