मर्सिडीझची जीएल क्लास / मर्सिडीझची जीएल क्लास एसयूव्ही लाँच

May 19,2013 03:00:00 AM IST

नवी दिल्ली - मर्सिडीझ बेंझने जीएल-क्लास ही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल श्रेणीतील कार सादर केली आहे. दिल्लीतील शोरूममध्ये त्याची किंमत 77.5 लाख रुपये इतकी आहे. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी माजी टेनिसपटू आणि जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बोरिस बेकरच्या मदतीच्या साहाय्याने वाहनांचा प्रचार करत आहे.

मर्सिडीझ बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ एबरहार्ड केर्न यांनी सांगितले की, भारतात मर्सिडीझ ब्रँडच्या वृद्धीच्या मोठ्या शक्यता आहे. भारतात सादर करणार्‍या निवडक वाहनांत जीएल-क्लास या मॉडेलचा समावेश आहे. यात आगामी काळात हॅचबॅक ए-क्लास ही कारदेखील सादर केली जाणार आहे. कंपनी 100 जीएल-क्लास कारची आयात करणार आहे. सप्टेंबरपासून पुण्याजवळील चाकण प्लँटमध्ये त्यांची जुळवणी केली जाईल. मर्सिडीझला सध्या ऑडी आणि बीएमडब्ल्यू या प्रीमियम वाहनांकडून कडवे आव्हान मिळत आहे.

X