आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू; वोडाफोन-एअरटेलसह आठ कंपन्यांचा सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 2G स्पेक्ट्रमच्या पुढील टप्प्यातील लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आजपासून (सोमवार) त्याची लिलाव प्रकिया सुरू झाली आहे. यात आठ नेटवर्क कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. त्यातून सरकारला सुमारे 11 हजार 300 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

रिलायन्सस कम्युनिकेशन्स, रिलायन्सस जियो, भारती एअरटेल, वोडाफोन, टेलीविंग्ज, एअरसेल, टाटा टेलीसर्व्हिसेस आणि आयडिया सेल्युलर या कंपन्या तिसर्‍या टप्प्यात होणार्‍या लिलावात सहभागी झाल्या आहेत. या टप्प्यात 900 MHz बॅंडमध्ये 46 मेगाहर्टज तर 1,800 MHz बॅंडमध्ये 403.2 मेगाहर्टज ठेवण्यात आले आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाव प्रक्रियेला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. नियमांनुसार, प्रत्येक कंपनीला आपली बोली लावण्यासाठी 240 मिनिटे अर्थात चार तासांचा कालावधी देण्यात आला आहे.