आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2g Spectrum Auction Start, Vodafone And Airtel Service Issue

..तर दिल्ली-मुंबईत बंद होईल वोडाफोन-एअरटेलची सर्व्हिस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 2जी स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रीया आजपासून (सोमवार) सुरू झाली आहे. रिलायन्सस कम्युनिकेशन्स, रिलायन्सस जियो, भारती एअरटेल, वोडाफोन, टेलीविंग्ज, एअरसेल, टाटा टेलीसर्व्हिसेस आणि आयडिया सेल्युलर या आठ कंपन्या तिसर्‍या टप्प्यातील लिलावात सहभागी झाल्या आहेत. या टप्प्यात 900 MHz बॅंडमध्ये 46 मेगाहर्टज तर 1,800 MHz बॅंडमध्ये 403.2 मेगाहर्टज ठेवण्यात आले आहे. त्यातून सरकारला सुमारे 11 हजार 300 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

परंतु, 2 जी स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु झाल्यानंतर भारती एअरटेलच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण दिसून आली. एअरटेल निफ्टीचे टॉप 50 शेअर्स घसरल्याने ही कंपनी आज टॉप लुझर्स कंपनी ठरली. आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे, दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये सर्विस देणारी संबंधित कंपनीचा परवाना येत्या नोव्हेंबरमध्ये समाप्त होत आहे. त्याचप्रमाणे वोडाफोनचेही दिल्लीसह मुंबई आणि कोलकातामधील परवाना येत्या नोव्हेंबर महिन्यात समाप्त होणार आहे. त्यामुळे स्पेक्ट्रम लिलाव वोडाफोन-एअरटेलसाठी खूप महत्त्वाचा आहे. दिल्लीसह मुंबई सर्कलसाठी स्पेक्ट्रम न मिळाल्याने एअरटेल-वोडाफोनची सर्व्हिस बंद होण्‍याची शक्यताही वर्तवली जात आहे.

'2 जी स्पेक्ट्रम खूप प्रभावशाली असल्याने 3जी आणि 4जी ब्रॉडबॅंड मोबाइल इंटरनेट सर्व्हिससाठीही त्याचा वापर केला जावू शकतो:.

दरम्यान, लिलाव प्रक्रियेला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. नियमांनुसार, प्रत्येक कंपनीला आपली बोली लावण्यासाठी 240 मिनिटे अर्थात चार तासांचा कालावधी देण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा लिलावाशी संबंधित 10 फॅक्ट्स...