आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2g Spectrum Scam Anil Ambani And Teena Ambani Hearing Pas pond To Frist August

2जी स्पेक्ट्रम घोटाळा: अंबानी दाम्पत्याची सुनावणी एक ऑगस्टपर्यंत स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 2जी स्पेक्ट्रम गैरव्यवहारप्रकरणी अनिल धिरूभाई अंबानी ग्रुप रिलायन्स कंपनीचे मालक अनील अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी हे दाम्पत्य कोर्टाच्या फेर्‍यात सापडले आहे. केंद्रीय अन्वेषन विभागाच्या (सीबीआय) कोर्टात हजर राहण्याच्या आदेशाविरोधातील सुनावणी एक ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठासमोर रिलायन्स टेलीकॉम लिमिटेड (आरटीएल) आणि द्रमुक प्रमुख एम करूणानिधी यांची कन्या एम कनिमोझी यांच्यासह चार याचिकाकर्त्यांची संयुक्त सुनवाणी होणार होती. परंतु कोर्टाच्या कामकाजाचा कालावधी संपल्यामुळे ही सुनावणी गुरूवारपर्यंत (एक ऑगस्ट) स्थगित करण्यात आली आहे.

सुनावणीला सोमवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुरुवात झाली होती. चार वाजून दहा मिनिटांपर्यंत सुनावणी सुरुच होती. आरटीएलतर्फे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायाधीश जी.एस सिंघवी आणि न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या खंडपीठासमोर आपले म्हणणे मांडले. त्यानंतर कनिमोझी यांच्या वकीलांनी आपली बाजू मांडली परंतु कोर्टाच्या कामकाजाचा कालावधी संपल्यामुळे पुढील सुनावणी एक ऑगस्टपर्यंत स्थगित करण्याचा कोर्टाने निर्णय जाहीर केला.