आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होडाफोनवर 3 महिने ट्विटर मोफत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंटरनेटचा वापर वाढावा यासाठी व्होडाफोन या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीने ट्विटरबरोबर सोमवारी करार केला. त्यानुसार व्होडाफोनच्या मोबाइल ग्राहकांना तीन महिने मोफत ट्विटर सेवा मिळणार आहे. त्यानुसार व्होडाफोन ग्राहकांना ट्विटर वेबसाइट किंवा त्यासंदर्भातील अधिकृत अँड्रॉइड अँपवरून तीन महिने मोफत ट्विट करता येणार आहे.

यासंदर्भात व्होडाफोन इंडियाचे सीसीओ विवेक माथूर यांनी सांगितले की, मोबाइल इंटरनेट अधिक सुलभ, स्मार्ट आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने ट्विटरबरोबर भागीदारी केली आहे. इंटरनेटच्या वापराचे लाभ ग्राहकांना सहज उपलब्ध करून देणे हाच यामागचा हेतू आहे. ट्विटर इंडियाचे मार्केट संचालक ऋषी जेटली यांनी व्होडाफोनबरोबरच्या भागीदारीतून आम्हाला खूप आशा असल्याचे म्हटले आहे.

सध्या मोबाइल इंटरनेटचा वापर करणारे 41 दशलक्ष ग्राहक व्होडाफोनकडे आहेत, त्यांना या सेवेचा फायदा होणार आहे.