आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या विचारांना सत्यात उतरवतील हे प्रिंटर; जाणून घ्या, या 3D प्रिंटर बद्दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतीकात्मक फोटो)

अनेक वेळा डोक्यात जे चालू आहे त्याच्या आकृत्या मेंदू बनवत असतो. अशा वस्तूंना अस्तित्वात बनवणे सोपे नसते. मात्र आता 3D प्रिंटींगमुळे डोक्यात जे काही चालू आहे त्याचे प्रतिकृती बनवता येऊ शकते. पाहूयात अशाच एका थ्रीडी प्रिंटरबद्दल
डोक्यात जे काही चालू आहे त्याला सत्यात उतरवणे शक्य आहे. ते म्हणजे थ्रीडी प्रिंटरमुळे. नुकतेच मुंबईच्या थ्रीडी पायोनियर, डिव्हाईड बाय झिरो कंपनीचे सीईओ स्वप्नील संसारे यांनी एक्यूक्राफ्ट आय 250 थ्रीडी प्रिंटर बनवले आहे. हे प्रिंटर पोर्टेबल आहे आणि याला जगभरात कोठेही अगदी सहज नेता येऊ शकते.
या प्रिंटरबद्दल सांगताना स्वप्नील म्हणाले की, या प्रिंटरचे विशेष म्हणजे तुम्ही जे काही विचार करत असाल, त्या विचारांना हे प्रिंटर सत्यात उतरवते. यामध्ये थ्रीडी प्रिंटींगचे अनेक ऑप्शन आहेत. उदा. एबीएस, नायलॉन, एचडीपीई इत्यादी. आपल्या पसंतीनुसार कोणतेही मटेरियल तुम्ही निवडू शकता. यामध्ये 20 मायक्रॉनच्या पोझिशन एक्यूरसी जोडल्याने हे जगातील सर्वात आधुनिक प्रिंटर बनेल. याची किंमत 80 हजार रुपये आहे. प्रिंटरसोबत ग्राहकांना एक दिवसाची इन -हाऊस प्रशिक्षण सुध्दा देण्यात येते.
पुढील स्लाईडवर इतर स्मार्ट प्रिंटरबद्दल जाणून घ्या...