आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ हजार कंपन्यांकडे ४ हजार कोटी पडून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सुमारे ३ हजार कंपन्यांकडे दावा न केलेली सुमारे ४ हजार कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मागील ५ ते ६ वर्षांत लाभांश, ठेवी आणि डिबेंचरच्या रूपात दिलेली ही रक्कम आहे.

सध्याच्या नियमानुसार दावा न केलेली रक्कम सात वर्षे तशीच पडून राहिली, तर नंतर ती रक्कम सरकारजमा होते. ही रक्कम परत काढता येत नाही. सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही जमा रक्कम गुंतवणूकदार संरक्षण फंडात टाकण्याचा सरकारचा विचार आहे.

रकमेला दावेदार नाही
कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले, विविध कंपन्यांकडून सप्टेंबरअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार ३१८९ कंपन्यांकडे सुमारे चार हजार कोटी रुपये आहेत. ज्यावर कोणत्याही गुंतवणूकदारांनी दावा सांगितलेला नाही. लाभांश, ठेवी आणि कर्जरोख्यांच्या रूपात कंपनीच्या गुंतवणूकदारांची ही रक्कम आहे. जी कोणीच काढून घेतलेली नाही.

का पडून आहे पैसा?
अधिका-याच्या मते, परिपक्वता कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून गुंतवणूकदारांना त्याबाबत सूचना पाठवली जाते. अनेक प्रकरणांत गुंतवणूकदारांचे पत्ते बदलले आहेत. काही प्रकरणांत गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला असून दावेदारांना त्याची माहिती नाही.

अशी मिळू शकते रक्कम
परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यानंतर सात वर्षांच्या आत रक्कम काढली नसेल, तर त्याची माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयांअंतर्गत इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडच्या वेबसाइटवरून मिळवता येते. वेबसाइटवर गुंतवणूकदारांचे नाव, पिता, पत्नीचे नाव आणि फोलिओ क्रमांकाने न काढलेल्या रकमेची माहिती मिळवता येते.