आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 40 Employee Quit Spice Jet Of Unsecured News In Divyamarathi

‘स्पाइस जेट’च्या ४० कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली, पायलट व उच्च अधिकार्‍यांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- असुरक्षित भविष्यामुळे स्पाइस जेट या खासगी विमान कंपनीच्या ४० कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. राजीनामे दिलेल्यामध्ये पायलट आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चालू अार्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला तब्बल ३१० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे, तर वर्षभरात कंपनीला ५५९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीने प्रवाशांच्या अभावामुळे अनेक विमानाचे उड्डाण रद्द केले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कंपनीने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांचा कंपनीसोबतच प्रवाशांनाही फायदा झाला. देशांतर्गत वाहतुकीत कंपनीच्या उत्पनात २८ टक्के वाढ झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.