मुंबई - निवडणुकीचा निकाल काहीही असो, पण निकालाच्या दिवशी म्हणजे 16 मे रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात (निफ्टी) 4,80,000 कोटी रुपयांचा डाव लागला आहे. गुंतवणूकदारांनी धोका कमी करण्यासाठी किंवा अधिक नफा कमावण्याच्या हेतूने वायदे बाजारात तेजी आणि घसरणीची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले आहेत. निकालाच्या दिवशी बाजारात तेजीची अपेक्षा असणा-यांनी निफ्टीचा निर्देशांक 7,500 अंकांच्या स्तरापर्यंत पोहचण्याचा अंदाज असल्याने 2,116,550 समभागांचे व्यवहार केले आहेत. तर रोज बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीच्या आधारावर बाजारात घसरण होईल असे वाटणा-यांनी निफ्टी 6000 अंकाच्याही खाली घसरण्याची भीती व्यक्त केली आहे. अशा गुंतवणूकदारांनी घसरणीच्या आधारावर 2,773,700 शेअरचे व्यवहार करण्यात आले आहेत. एका अंदाजानुसार जर निफ्टीमध्ये 700 अंकांची घसरण झाली तर त्यामुळे बाजाराला 4,80,870 कोटींचा फटका बसू शकतो.