आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्वल पाच कंपन्यांचे बाजार भांडवल आटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टीएसएस, इन्फोसिस यांच्यासह बीएईतील पाच बड्या कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल गेल्या आठवड्यात 20 हजार 600 कोटी रुपयांनी घसरले आहे.
टीसीएस, इन्फोसिसबरोबरच रिलायन्स, ओएनजीसी, आयटीसी या कंपन्यांच्या वैयक्तिक बाजारमूल्यात घट झालेली असून कोल इंडिया, स्टेट बॅँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बॅँक, भारती एअरटेल यांचे बाजार भांडवल वाढले आहे. टॉप टेन कंपन्यांत टीसीएसने पहिले स्थान कायम ठेवले असून रिलायन्स दुसºया क्रमांकावर आहे. पाठोपाठ ओएनजीसी, कोल इंडिया लि., आयटीसी, स्टेट बॅँक, इन्फोसिस, एचडीएफसी बॅँक, एनटीपीसी आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी टाटा समुहातील टीसीएस या सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीवर कुरघोडी करत ओएनजीसी ही देशातील ‘मोस्ट व्हॅल्यूड’ कंपनी बनली. परंतु हे अव्वल स्थान औटघटकेचे ठरले. दुसºयाच दिवशी टीसीएस ओएनजीसीवर मात करीत पुन्हा मोस्ट व्हॅल्यूड कंपनी ठरली. सप्ताहाच्या अखेरीस मात्र ओएनजीसी तिसºया क्रमांकावर घसरली.
बीएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल
कंपनी बाजार भांडवलातील वध/घट एकूण बाजार भांडवल
स्टेट बॅँक आॅफ इंडिया +3,949 कोटी रु. 1,48,837 कोटी रु.
कोल इंडिया लि. + 2,527 कोटी रु. 2,21,957 कोटी रु.
एनटीपीसी +618 कोटी रु. 1,32.339 कोटी रु.
भारती एअरटेल + 6,266 कोटी रु. 1,22,090 कोटी रु.
एचडीएफसी बॅँक + 4,959 कोटी रु. 1,37,330 कोटी रु.
टीसीएस 6,136 कोटी रु. 2,43, 908 कोटी रु.
इन्फोसिस 3,370 कोटी रु. 1,40,333 कोटी रु.