आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगार तरुणांना खुशखबर; बॅंकामध्ये 50 हजार पदे भरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेरोजगार तरुणांना खुशखबर आहे. चालू आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये विविध सरकारी बॅंका आठ हजार नव्या शाखा सुरु करणार आहे. यामुळे देशातील बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहेत. जवळपास 50 हजार लोकांना ही संधी उपलब्ध होणार असल्याचे सू‍त्रांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या थेट अनुदान योजनेनुसार लाभार्थीच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. या पार्श्वभूमीवर वि‍विध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांना बॅंकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्यामुळे विविध सरकारी बॅंकांना शाखा वाढविणे आवश्यक आहे. विभागीय ग्रामीण बॅंक जवळपास दोन हजार शाखा सुरु करणार आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. 'पेट्रोल पंपावर मिळेल एलपीजी सिलिंडर; स्वस्त झाले गृहकर्ज'