आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 60,000 Camps Set Up Across The Country For PM Modi\'s Jan Dhan Scheme

\'प्रधानमंत्री जन-धन योजने\'साठी देशभरात लागणार 60,000 कॅम्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आर्थिक सर्वसामावेशकतेमधील सर्वात मोठे अभियान 'प्रधानमंत्री जन-धन योजने'ला यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. बँकेचे खाते उघडण्यासाठी बँक 60,000 कॅम्प लावणार आहे. रिजर्व बँकेनुसार हे खाते चालू राहण्यासाठी या बँकांनी या खात्यांमध्ये सर्व सुविधा देणे आवश्यक आहे.
प्रत्येक कुटुंबाला बँक खाते देण्याकरिता 28 ऑगस्टपासून अभियान राबवण्यात येईल. बँकांची संस्था आयबीएनुसार प्रधानमंत्री जनधन योजनेला यशस्वी करण्यासाठी बँक एका वर्षात 7.5 कोटी खाती उघडणार आहेत. यासाठी बँका जवळपास 60,000 कॅम्प लावतील. या बँक खात्यामध्ये ग्राहकांना 1 लाखांचा अपघात वीमा देण्यात येईल तसेच ओव्हरड्राफ्ट सुविधा सुध्दा देण्यात येईल. ज्या लोकांकडे ओळखपत्र आणि कायमचा पत्ता नाही त्यांनासुध्दा आधार क्रमांक देण्यात येईल. मुख्य आव्हान तर बँकेचे खाते उघडल्यानंतर असणार आहे, कारण जर खात्यामध्ये व्यवहार झाले नाही तर संपूर्ण प्रयत्न निष्फळ ठरतील.
आर्थिक सर्वसमावेशकतेच्या या अभियानासमोर अजून अनेक आव्हान आहेत. या अभियानांतर्गत यापूर्वीही अनेक वेळा अकाऊंट उघडण्यात आले, मात्र ते काही काळानंतर पून्हा बंद झाले. जाणकारांच्या मते या योजनेला यशस्वी बनवण्यासाठी हे खाते चालू असणे गरजेचे आहे तेव्हाच कुठे बँका आणि ग्राहक या दोघांना फायदा होऊ शकेल.