आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 64.5 Crore Dollars Loss To Social Networking Site Twitter

फेसबुक फर्मात, टि्वटर तोट्यात; तब्बल 64.5 कोटी डॉलरचा तोटा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोशल नेटवर्किंग साइट्स 'फेसबुक' आपला दशकपूर्ती सोहळा साजरा करत असताना मायक्रो ब्लॉगिंग साइट 'ट्विटर'ला मात्र फटका बसला आहे. 'ट्विटर'ला 2013 मध्ये सुमारे 64.5 कोटी डॉलर्सचा तोटा झाला आहे. याचा परिणाम ट्‍विटरच्या शेअर्सवरही दिसून आला आहे. ट्‍विटरचे शेअर्स 25 टक्क्यांनी घसरले आहे.

2013 वर्षात सुमारे 64.5 कोटी डॉलर्सचा तोटा झाल्याचे 'ट्विटर'ने जाहीर केले आहे. गेल्या वर्षी ट्विटरच्या उत्पन्न 110 टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, तरीही त्यावेळी तज्ज्ञांनी तोट्याबाबतची शंका व्यक्त केली होती.

'ट्विटर'वर युजर्सची संख्या कासवगतीने वाढत आहे. तसेच 'ट्विटर'चा टाईमलाईन व्ह्यूही सात टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे कंपनीची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे.