आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 लाखांची देखणी बीएमडब्ल्यू झेड फोर पुण्‍यात सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बीएमडब्ल्यूची शान म्हणून ओळखली जाणारी झेड फोर रोडस्टर या आलिशान कारचे देशातील पहिले सादरीकरण गुरुवारी पुण्यात करण्यात आले. आकर्षक लूक, लांब-रुंद बॉनेट, फोल्डिंग मेटल रुफ आणि कमालीचे आकर्षक बाह्यरूप असणा-या या नव्या झेड फोरचा ग्राहक देशातील उच्चभ्रू गटातील युवा वर्ग असणार यात शंका नाही. भारतीय बाजारात या नव्या झेड फोरची किंमत सत्तर लाखांच्या घरात (68.90 लाख रुपये एक्स शो रुम)आहे, अशी माहिती बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष फिलिप वॉन सार यांनी येथे दिली.
नव्या झेड फोरमध्ये डिझाइन, रंगसंगती, लूक, दर्जा या सर्वच बाबतीत उत्कृष्टता हा एकच निकष वापरण्यात आला आहे. बीएमडब्ल्यूच्या परंपरेला साजेसे असेच नवे मॉडेल आहे. इंडिकेटर्स, व्हील आर्चेस, कोरोना रिंग्ज, एलईडी अ‍ॅक्सेस लाइटस - हेडलाइटस ही गाडीची वैशिष्ट्ये आहेत. सनरिफ्लेक्टिव्ह तंत्रज्ञानामुळे गाडीला वेगळा डौल मिळाला आहे.