आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7th Central Pay Commission Anounced, Recommendations Likely In 2 Yrs

सातव्या वेतन आयोगाची घोषणा, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मधाचे बोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाची आज (बुधवार) घोषणा केली. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुष करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मंजुरी दिली आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील. त्यासाठी यासंदर्भातील सर्व पक्षांशी संपर्क साधला जाईल.

वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर शिफारशी देण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाने शिफारशी देण्यास जर दोन वर्षांचा कालावधी घेतला तर 1 जानेवारी 2016 पासून शिफारशी लागू केल्या जातील, असे दिसून येते.

चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी कधी लागू करण्यात आल्या, वाचा पुढील स्लाईडवर...