आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8.50 Percent Interest Get On Pf : Employmee Provident Fund Orgnization

पीएफवर मिळणार 8.50टक्के व्याज : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) चालू आर्थिक वर्षातील (2012-13) भविष्य निर्वाह निधी गुंतवणुकीवर 8.50 टक्के व्याज देण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात या गुंतवणुकीवर 8.25 टक्के व्याज होते. संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या 15 फेब्रुवारी रोजी होणा-या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. यामुळे संघटनेच्या पाच कोटी कर्मचारी वर्गणीदारांना फायदा होईल.

सूत्रांनी सांगितले, चालू आर्थिक वर्षात भविष्य निधी गुंतवणुकीवर 8.50 टक्के व्याज देण्याचा ईपीएफओचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आर्थिक तूट पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ईपीएफओने 2010-11 या आर्थिक वर्षात भविष्य निधी गुंतवणुकीवर 9.5 टक्के व्याज दिले होते. गेल्या आर्थिक वर्षात मात्र कपात करून व्याज 8.25 टक्के करण्यात आले.

ईपीएफओ हा व्याजदर वाढीची तरतूद असलेला प्रस्ताव संघटनेची सल्लागार अर्थ व गुंतवणूक समितीसमोर (एफआयसी) 14 फेब्रुवारी रोजी ठेवणार आहे. एफआयसीने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव श्रम मंत्रालयाच्या सीबीटीकडे अंतिम मंजुरीसाठी जाईल. वित्त मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर व्याजदर वाढीची अधिसूचना जारी होईल.

व्याजदर निश्चिती रखडली
सर्वसाधारणपणे, ईपीएफओ वर्षाच्या प्रारंभी व्याजदराची घोषणा करते. मात्र, यंदा यास विलंब झाला आहे. व्याजदर निश्चितीसाठी केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक लवकर घेण्यासाठी कर्मचारी संघटनांनी दबाव टाकला आहे.

गुंतवणुकीचे नियम शिथिल करणार
गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याचा ईपीएफओचा विचार आहे. कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक करता यावी यासाठीचे हे नियम असून, त्याची सध्याची 15 वर्षे ही मुदत 10 वर्षांवर आणणे, खासगी कंपन्यांची कक्षा रुंदावण्याचा विचार आहे.