आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर, 2014 मध्ये नव्या नोकर्‍यांच्या 8.5 लाख संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बेरोजगारांसाठी नवे वर्ष अत्यंत आनंदी ठरणार आहे. आरोग्य सेवा, एफएमसीजी क्षेत्रासह अनेक क्षेत्रांत 2014 मध्ये रोजगाराच्या 8.5 लाख संधी उपलब्ध होणार आहेत. नोकर्‍यांसंदर्भात काम करणार्‍या माय हायरिंग डॉट कॉम या पोर्टलने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
पोर्टलच्या मते, सध्या जगभरात आर्थिक पातळीवर अस्थिरता असली आणि भारतही त्याला अपवाद नसला तरी, 2014 मध्ये सरत्या वर्षाच्या 7.9 लाख रोजगार संधीच्या तुलनेत 2014 मध्ये जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या सर्वेक्षणासाठी माय हायरिंग डॉट कॉमने देशातील 12 औद्योगिक क्षेत्रांतील 5600 कंपन्यांची मते आजमावली होती. रोजगाराच्या बहुतेक संधी संघटित क्षेत्रांत असल्याचे अहवालात म्हटले आहे. एफएमसीजीशिवाय आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, रिटेल आणि हॉस्पिटॅबिलिटी या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर नोकर्‍यांच्या संधी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.
माय हायरिंग डॉट कॉमचे सीईओ राजेश कुमार यांनी सांगितले, सरत्या वर्षात आर्थिक आणि राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात अस्थैर्य दिसून आले. त्यामुळे बेरोजगारांसाठीच नव्हे, तर संस्थांसाठीही हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. मात्र, येणार्‍या 2014 या वर्षात विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी आहेत. त्यामुळे आगामी वर्षात 8.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक वृद्धीच्या किंवा विकासाच्या पातळीवरील औदासीन्य हे सध्या नोकरी देणार्‍यांच्या दृष्टीने सर्वात मोठे काळजीचे कारण आहे. ते दूर होण्यासाठी प्राधान्याने पावले टाकायला हवीत, असे त्यांनी सुचवले.
आशादायी वर्ष
नोकर्‍यांच्या पातळीवर 2013 वर्ष सर्वच आघाड्यांवर फारसे यशस्वी नव्हते. येणारे वर्ष मात्र रोजगाराच्या भरपूर संधी घेऊन येणार आहे. 2014 मध्ये आर्थिक पर्स्थििती सुधारण्याची शक्यता आणि विविध क्षेत्रांतील मुबलक संधी यामुळे आशादायी चित्र आहे. 2013 मध्ये ज्या जागा रिकाम्या झाल्या त्या भरण्यावरच कंपन्यांचा भर होता.
प्राची कुमारी, संचालक, सॅट-न-मर्च मॅनपॉवर कन्सल्टंट.