आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या अर्थसंकल्पात ८ टक्के वाढीचे लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) आकड्यातील सुधारणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आगामी अर्थसंकल्पात २०१५-१६ या आर्थिक वर्षातील वाढीसाठी ८ टक्के विकासदराचे लक्ष्य ठेवण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाच्या नियोजनाशी संबंधित सूत्रांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची कामगिरी चांगली राहिली. हे लक्षात घेता विकासदराचे लक्ष्य किमान ८ टक्के ठेवणे योग्य राहील. अर्थमंत्री येत्या २८ फेब्रुवारीला लाेकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

सरकारने आंतरराष्ट्रीय निकषांनुसार देशातील आर्थिक स्थितीची गणना करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. परिणामी देशाच्या विकासदरात चांगली वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या ४.१ टक्क्यांपर्यंत राखण्यासाठी सरकारला आपल्या खर्चात सुमारे ९१०० कोटी रुपयांची कपात करावी लागणार आहे. जीडीपीचे नवे आकडे फॅक्टर कॉस्टऐवजी मार्केट प्राइसवर आधारित आहेत. यावर तज्ज्ञांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

नव्या आकड्यांमुळे संभ्रम : नवी दिल्ली : नव्या आर्थिक आकडेवारीने अर्थतज्ज्ञांना बुचकळ्यात टाकले आहे. तज्ज्ञांच्या मते, ही आकडेवारी कर संकलन आणि कर्जवृद्धीच्या आकड्यांच्या विरुद्ध आहे. एचडीएफसी बँकेच्या अहवालानुसार, नव्या आकड्यांमुळे संभ्रम वाढला आहे. आयएनजी वैश्य बँकेच्या मते, विकासाचे गतिमान आकडे वास्तविक आकड्यांशी मिळतेजुळते नाहीत. रेटिंग एजन्सी क्रिसिलनेही याकडे लक्ष वेधले. मागील वर्षात कर्जात १४.३ टक्के वाढ झाली, यंदा १२ ते १४ टक्के वाढीचा अंदाज आहे. डिसेंबरपर्यंत सेवाकर संकलन १९.२ टक्क्यांच्या तुलनेत १०.२ टक्क्यांनी वाढले आहे.