आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, देशातील 9 लक्ष छोटे उद्योग कशा प्रकारे घेताहेत फेसबुकचा फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - फेसबुकच्या माध्यमातून लोकं केवळ आपल्या नातेवाईक, मित्रांशीच जोडले जात नाही तर, अनेक उद्योजक याचा वापर आपल्या उद्योग वाढवण्यासाठीही करत आहेत. फेसबुकचे सीओओ शेरिल सॅनबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशातील 9 लक्ष लघु उद्योग व मध्यम उद्योग (एसएमबी- लहान आणि मध्यम व्यवसाय) आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याकरिता फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
जगभरातील 3 कोटी एसएसबी आपल्या ग्राहकांशी संपर्कात राहण्यासाठी आणि आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी फेसबुकचा वापर करत असल्याचेही सॅनबर्ग यांनी सांगितले.
10 कोटीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते
सॅनबर्ग म्हणतात की, भारतात आमच्याजवळ 9 लक्ष लहान उद्योगांचे फेसबुक पेजेस आहेत. आता भारतीय जास्त टेकसेव्ही झाले आहेत. सोशल मेडिया हे दैनंदिन जीवनातील घटक आहेत. ” भारतात फेसबुक वापरणार्‍यांची संख्या 10 कोटीपेक्षा जास्त आहे. यामुळे या लहान उद्योग आणि व्यवसायांना आपल्या विस्तारासाठी तसेच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी फेसबुकचा वापर करता येऊ शकतो.
पुढील स्लाईडमध्ये वाचा सविस्तर बातमी....