आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 कोटी रुपयांच्या बाइकचे फोटो झाले व्हायरल, जाणून घ्या यामागील सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- सोशल मीडियावर एका बाइकचे फोटो व्हायरल झाले आहे. या बाइकची किंमत 10 कोटी रुपये सांगितली जात आहे. 'फेसबुक' व 'वॉट्सअॅप'वर शेअर होत असलेली बाइक राजस्थानमधील सीकरचे आमदार रतनसिंह जलधारी यांच्या मुलाची असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे बाइकमध्ये खास..?
- 'इंडियन शेफ क्लासिक' नामक ही क्रूजर बाइक अमेरिकन ब्रँड- इंडियन मोटरसायकल कंपनीची आहे.
- व्हाइट कलरमधील ही बाइक 1,811CC ची आहे.
- या बाइकची किंमत 23 लाख रुपयांच्या जवळपास आहे.
- ही बाइक 20 kmpl चा मायलेज देते.
- अत्याधुनिक टेक्नॉॅलॉजी व ट्रॅडिशनल स्टाइलचे कॉम्बिनेशन आहे.
- बाइकच्या पेट्रोल टॅंकवर डिजिटल स्पीडोमीटर बसवले आहे.
- बाइकला 'थंडर स्ट्रोक 111' इंजिन बसवले आहे.

सोशल मीडियापर व्हायरल होत आहेत फोटो
- सोशल मीडियावर या बाइकचे फोटो शेअर केले जात आहेत. भारतातील पहिली व सर्वात महागडी बाइक असल्याचे सांगितले जात आहे.
- सीकर आरटीओमध्ये बाइकला पाहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचेही सांगितले जात आहे.
- सीकर आरटीओकडे यासंदर्भात विचारणा केली असता, अशी कोणतीही बाइक रजिस्ट्रेशनसाठी आली नसल्याची माहिती मिळाली.

यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते फोटो...
- यापूर्वीही सोशल मीडियावर या बाइकचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा 'सुपर बाइक' म्हणून फोटो शेअर करण्यात आले होते.
- जानेवारी 2015 मध्ये बाइकचे फोटो शेअर झाले होते. महाराष्ट्रातील वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा उतंग ठाकूर यांची ही बाइक असल्याचे सांगण्यात आले होते.
- यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्यावर कडाडून टीका करण्‍यात आली होती. जनतेच्या रुपयांचा चुकीचा वार केल्याचा आरोप ठाकूर यांच्यावर करण्यात आला होता.

पुढील स्लाइडवर पाहा, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लक्झरी बाइकचा फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...