आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVS Victor लवकरच नव्या रुपात; Apache 200/250cc होणार लॉन्च, वाचा स्पेसिफिकेशन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टू-व्हीलर कंपनी TVS यंदा तीन नव्या बाइक्स बाजारात उतरवणार आहे. यात TVSची लोकप्रिय बाइक Victor च्या नव्या मॉडेलचा समावेश असेल. याशिवाय TVS Apache 200 आणि TVS Apache 250cc लॉन्च करण्याची कंपनीने तयारी केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे चेअरमन वेणु श्रीनिवासन यांनी शेअर होल्डर्सच्या बैठकीत ही माहिती दिली. तिन्ही बाइक्स दमदार असून त्या पुढील सहा महिन्यांत बाजारात दाखल होतील, असे श्रीनिवासन यांनी सांगितले.

TVS Apache 250cc चे स्पेसिफिकेशन
> Draken-X21 कॉन्सेप्टच्या धर्तीवर निर्मिती
>Draken-X21 ला 2014 दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्‍यात आली होले
>Apache 250cc मध्ये लेटेस्ट फीचर्स देण्यासोबत लूककडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
>दमदार इंजिन
> सहा गिअर
> इंजिन क्षमता 38.5 बीएचपी

संभाव्य किंमत: 1.45 लाख रुपये

संभाव्य लॉन्चिंग: पुढील सहा महिने

कोणासोबत स्पर्धा: बजाज KTM Duke 200, Bajaj Pulsar 200ss, Honda CBR 250R, Kawasaki Ninja 300
पुढील स्लाइडवर वाचा, TVS Apache 200cc च्या स्पेसिफिकेशन्स विषयी...