आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Cars With Price Up To Rs 7 Lacs To Be Launched In India For The First Time

भारतात पहिल्यांदा लॉन्च होतील या पाच शानदार कार, किंमत 4-7 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- फेस्टीव्ह सीझन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर ऑक्‍टोबर ते डिसेंबर महिन्यात ऑटोमोबाइल इंडस्‍ट्रीमधील तेजी कायम राहाणार आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ऑटो इंडस्ट्री्त मंदीचे सावट पसरले होते.

दिवाळीत भारतीय बाजारात विदेशातील काही ऑटो कंपन्या पदार्पण करत आहेत. या कंपन्यांनी लेटेस्ट मॉडेल लॉन्च करण्‍याची घोषणा केली आहे. यापूर्वी 'ऑटो एक्‍सपो 2014'मध्ये काही मॉडेल सादर करण्यात आले होते. याशिवाय, काही मॉडेल्‍स वि‍देशात सादर केले होते. आता या कंपनींनी भारतीय बाजारावर फोकस केला आहे. कॉम्‍पॅक्‍ट सेग्मेंटपासून एसयूव्ही मॉडेल्‍स पुढील तीन महिन्यांच्या काळात लॉन्च होणार आहे. या कारच्या किमती 4 ते 7 लाख रुपयेदरम्यान असू शकतात.

‍ऑक्टोबर ते डिसेंबर 2015 पर्यंत कोणत्या नव्या कार भारतीय बाजारात दाखल होणार आहे, याविषयी आम्ही आपल्याला माहिती देत आहोत.

Datsun Redi Go
जपानची कार कंपनी Datsun आपल्या री-लॉन्‍च स्‍ट्रॅटजीसह 'Redi Go' नावाने तिसरी कार भारतीय बाजारात उतारण्याची योजना केली आहे. ऑटो एक्स्पो 2014 मध्ये कंपनीने ही कार सादर केली होती. यापूर्वी भारतात Datsun कंपनीने GO व GO plus मॉडेल लॉन्च केले होते.

फीचर्स:
Datsun Redi Go मध्ये Go व Go plus प्रमाणेच क्रोम हेक्‍सागोनल ग्रि‍ल असतील. परंतु बॅक हेडलाइटमध्ये बदल करण्‍यात येणार आहे. एअर डॅमच्या माध्यमातून फ्रंट ग्रि‍लला बंपरपासून स्वतंत्र ठेवले आहे. हेडलाइट्स व फॉग लॅम्‍प एलईडी असणार आहेत.

इंजिन:
>1.2 लिटरचे तीन सिलिंडर इंजिनसह 67bhp व 104Nm टॉर्क
>फाइव्ह स्‍पीड मॅन्युअल गिअरबॉक्‍स
>सीएनजी अथवा एलपीजी ऑप्‍शन

किंमत:
3.5 लाख ते 5.5 लाख

लॉन्चिंग:
फेस्‍टि‍व्ह सीजन

पुढील स्‍लाइडवर वाचा, महिंद्रा अँण्ड महिंद्रा देखील लॉन्च करणार एसयूव्ही...