Home | Business | Auto | 5 cost effective sedan cars for more mileage

विना गेअर वाल्या 5 सर्वात कमी खर्चिक सेडान, 28 Kmpl देतात मायलेज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 23, 2017, 11:23 AM IST

नवी दिल्ली- सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलची (एसयुव्ही) डिमांड वाढली आहे.

 • 5 cost effective sedan cars for more mileage

  नवी दिल्ली- सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलची (एसयुव्ही) डिमांड वाढली आहे. पण गेल्या काही महिन्यातील सेल्स आकडे सांगतात, की कॉम्पॅक्ट सेडान कारची विक्रीही तेजीत आहे. ग्राहकांना या कॉम्पॅक्ट सेडान कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन म्हणजेच विना गेअरचा ऑप्शन मिळत आहे. सोबत फ्युअल इफिशिअन्सीतही या कार अग्रेसर आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा कारची माहिती देणार आहोत ज्यांचा मायलेज जास्त आहे आणि या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहेत.

  मारुती सुझुकी डिझायर १.३ डीडीआयएस ऐजीएस
  मारुती सुझुकीने या वर्षी लॉंच केलेल्या नव्या डिझायरने कार मार्केटवर पूर्णपणे कब्जा केला आहे. सर्वात गतीने विकणारी कार म्हणून या कारकडे बघितले जाते. डिझायरला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध करण्यात आले आहे. हे ऑप्शन पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे. मायलेजचे बोलायचे झाले तर डिझेल नेहमीच पेट्रोल पेक्षा जास्त मायलेज देते.

  मायलेज- २८.४० Kmpl
  किंमत- ७.४८ लाख ते ८.३६ लाख रुपये

  पुढील स्लाईडवर वाचा... आणखी चार कमी खर्चिक सेडान... पडाल प्रेमात...

 • 5 cost effective sedan cars for more mileage

  फॉक्सव्हॅगन एमिओ १.५ टीडीआय डीएसजी
  फॉक्सव्हॅगन एमिओ एकमेव कॉम्पॅक्ट सेडान कार आहे जी अॅडव्हान्स ऑटोमॅटिक, ७ स्पीड डीएसजी ऑफर करते. कमी खर्चिक असण्यासह ही मॉडर्न ड्युअल क्लच ऑटोमॅटिक डिझेल कॉम्बोसह येते.

   

  मायलेज- २१.७३ kmpl
  किंमत- ६.६५ लाख रुपये

 • 5 cost effective sedan cars for more mileage

  स्कोडा रॅपिड टीडीआय सीआर अॅम्बिशन अॅट/१.५ टीडीआय सीआर स्लाईल अॅट

  डिझेल सेडान कारच्या लिस्टमध्ये स्कोडा रॅपिडचे नाव घेतले जाते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ही कार येते. कंपनीने याचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉंच केले आहे. यात जास्त जाड १६ इंच व्हील्स आणि रिअर पार्किंग कॅमेरा सारखे फिचर्स सामिल आहे. याचे दोन व्हेरायंट आहेत.

   

  मायलेज- २१.७२ Kmpl
  किंमत- ११.८७ लाख ते १३.४७ लाख रुपये

 • 5 cost effective sedan cars for more mileage

  फॉक्सव्हॅगन वेंटो १.५ टीडीआय डीएसजी

  या लिस्टमध्ये फॉक्सव्हॅगन व्हेंटोचेही नाव घेता येईल. कंपनीने ड्युअल क्लच ऑटोमॅटिक डिझेल व्हर्जनला पहिल्यांदा व्हेंटोसह सादर केले आहे. त्यानंतर ही कार पॉप्युलर झाली.

   

  मायलेज- २२.१५ kmpl
  किंमत- ११.९० लाख ते १३.८७ लाख

 • 5 cost effective sedan cars for more mileage

  टाटा जेस्ट १.३ क्वाड्राजेट एफ-ट्रॉनिक

  कॉम्पॅक्स सेडान सेगमेंटमध्ये डिझेलसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ही कार येत आहे. यात अनेक आकर्षक फिचर्स सामिल करण्यात आले आहेत. त्यात हरमन पॉवर्ड टचस्क्रीन ऑडिओ सिस्टिमसह स्पीकर सिस्टिम, प्रोजेक्ट हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प यांचा समावेश आहे.

   

  मायलेज- २१.५८ kmpl
  किंमत- ८.५९ लाख रुपये

Trending