तुमच्या या 5 / तुमच्या या 5 चुका करतात कारचे मायलेज कमी, यावर ठेवा लक्ष

तुमच्या या 5 चुका करतात कारचे मायलेज कमी, यावर ठेवा लक्ष.नवी दिल्ली- कार विकत घेताना आपण कारचे सगळे फिचर्स जाणून घेतो. यावेळी कारच्या मायलेजवर विशेष लक्ष देतो. कारण त्यावरुन आपला खिसा किती रिकामा होणार आहे याचा अंदाज येतो. पण जेव्हा तुम्ही कार चालवायला घेता तुम्हाला मायलेज कमी मिळत असल्याचे दिसून येते. यावेळी तुम्ही कार कंपनीला दोष देता. पण बऱ्याच वेळा तुमच्या चुकांमुळे कारचे मायलेज कमी झालेले दिसून येते.

Nov 25,2017 05:09:00 PM IST

नवी दिल्ली- कार विकत घेताना आपण कारचे सगळे फिचर्स जाणून घेतो. यावेळी कारच्या मायलेजवर विशेष लक्ष देतो. कारण त्यावरुन आपला खिसा किती रिकामा होणार आहे याचा अंदाज येतो. पण जेव्हा तुम्ही कार चालवायला घेता तुम्हाला मायलेज कमी मिळत असल्याचे दिसून येते. यावेळी तुम्ही कार कंपनीला दोष देता. पण बऱ्याच वेळा तुमच्या चुकांमुळे कारचे मायलेज कमी झालेले दिसून येते. त्यामुळे तुम्ही या ५ गोष्टींवर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नाही तर तुमचा खिसा रिकामा झाल्याशिवाय राहणार नाही.

दुसऱ्या व्हेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवा
गाडी चालवताना दुसऱ्या गाडीपासून तुम्ही सुरक्षित अंतर राखले पाहिजे. त्यामुळे तुम्ही सहजपणे ट्राफिकच्या फ्लोमध्ये जात असता. तुम्हाला वारंवार गेअर बदलावा लागत नाही तसेच ब्रेस अप्लाय करावा लागत नाही. तुमची फ्युअल इफिशिअन्सी वाढते. तुम्ही क्लच, एक्सिलेटर आणि ब्रेकपासून जेवढे दूर राहणार तेवढे तुमचे मायलेज वाढते.

पुढील स्लाईडवर वाचा, कारचे मायलेज वाढविण्याच्या काही सोपी पद्धती... ठेवा यावर लक्ष...

कारमध्ये अनावश्यक सामान ठेवू नका कारला मोठी डिक्की असेल तर तुम्ही त्यात अनावश्यक सामान ठेवता किंवा एखाद्या वेळी ठेवलेले सामान काढायचे विसरुन जाता त्यामुळे ते तसेच पडून राहते. या सामानाचे वजनही तुमचे मायलेज कमी करत असते. 48 किलो सामान तुमचे फ्यअल २ टक्काने कमी करते असे एका निरिक्षणात आढळून आले आहे.कारची सर्व्हिसिंग बरेच लोक कारची सर्व्हिसिंग महाग असल्याने टाळायचा प्रयत्न करतात किंवा उशीराने करतात. अशा वेळी याचा फटका तुम्हाला फ्युअल इफिशिअन्सीत बसतो. कारची नियमित सर्व्हिसिंग करा. तसे केल्यास तुम्हाला योग्य मायलेज मिळेल.स्पीड आणि गेअर पेट्रोल कारला २००० आरपीएम आणि डिझेल कारला १५०० आरपीएमवर चालविल्यास योग्य मायलेज मिळेल. योग्य मायलेजसाठी कारची स्पीड आणि गेअर याचे बॅलेन्स ठेवा. यातून तुम्हाला मायलेजमध्ये फायदा झालेला दिसून येईल.टायरमधील हवेचे प्रेशर चेक करा टायरमधील हवेच्या प्रेशवर लोक लक्ष देत नाहीत. टायर प्रेशर आणि कारच्या मायलेजचा थेट संबंध असतो. हवेचा दबाव मायलेजवर परिणाम करत असतो. विशेष म्हणजे लांब पल्ल्यावर जात असताना तुम्ही हवेचे प्रेशर चेक करणे अत्यंत आवश्यक असते.
X