Home | Business | Auto | here you can buy used cars on half price

अर्ध्या किंमतीमध्ये विकल्या जात आहे बोलेरो पासून होंडा सिविक, ही आहे यूज्ड कारची लिस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 08, 2018, 06:43 PM IST

नवीन एसयूव्ही खरेदी करणे हे बजेटमुळे शक्य नसेल तर सेकंड हँड मार्केटने ही अडचण दूर केली आहे.

 • here you can buy used cars on half price

  नवी दिल्ली - इंडियन ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये नव्या कारपेक्षा यूज्ड कारची व्हॅल्यू वाढली आहे. कारण आजकाल लोक फार वेगाने आपल्या कार बदलत आहेत. विशेषतः हॅचबॅक ऐवजी लोकांची सिडॅन आणि एसयूव्ही कारला अधिक पसंती मिळत आहे. नवीन एसयूव्ही खरेदी करणे हे बजेटमुळे शक्य नसेल तर सेकंड हँड मार्केटने ही अडचण दूर केली आहे. या कारच्या किंमती 25 ते 50 टक्केपर्यंत कमी किंमतीत खरेदी करता येतात.

  येथे खरेदी करता येतात सर्टिफाइड यूज्ड कार
  - सेकंड हँड कार मिळण्याची सध्या अनेक अधिकृत ठिकाणे आहे. त्यात ड्रूम, कारदेखो सारखे ऑर्गनाइज्ड प्लेअर्स आहेत. त्यासोबतच टोयोटाचे टोयोटा ट्रस्ट, महिंद्राचे फर्स्ट चॉईस आणि मारुती सुझुकी इंडियाच्या ट्र्यूव्हॅल्यू येथून सर्टिफाइड कार खरेदी करता येऊ शकतात.
  - येथे कारची संपूर्ण तपासणी झालेली असते, त्यानंतरच ग्राहकांना विक्री केली जाते. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कारवर फायनान्स सुविधा देखील उपलब्ध करुन दिली जाते.
  - येथे आम्ही तुम्हाला असे पर्याय देत आहोत ज्याद्वारे तुम्ही कार खरेदी करु शकता. साधरणतः या कार 4 ते 5 वर्षे जुन्या असतात.

  बोलेरो
  - महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) कंपनीची बोलेरो ही कार सध्या यूज्ड कारच्या बाजारात सर्वाधिक पसंतीची आहे. बोलेरोच्या बीएस-4 श्रेणीतील मॉडेल कमी किंमतीत सहज उपलब्ध होऊ शकते. या कारमध्ये 2523 सीसी इंजिन आहे. 46.3 केडब्ल्यू पॉवर आणि 195 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.
  - या कारची एक्स शोरुम किंमत 7.75 लाखांपासून सुरु होते. यूज्ड कार मार्केटमध्ये ही कार 5.50 लाखात खरेदी करता येते.

  पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणत्या कार मिळत आहेत सेकंड हँड मार्केटमध्ये...

 • here you can buy used cars on half price

  स्कोडा vRS 
  - स्कोडा vRS या कारबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही. अनेकांच्या पसंतीची ही कार आहे. या कारमध्ये 2.0 लीटर इंजिन आहे. ऑडी टीटी जनरेशनमधून ते घेतलेले आहे. हे इंजिन 150 बीएचपी पॉवर जनरेट करु शकते. त्यामध्ये 5 स्पीड गियरबॉक्स आहे. 
  - vRS बॉडी किटसोबत ही कार अधिकच शानदार दिसते. vRS चे जास्त मॉडेल मार्केट मध्ये उपलब्ध नाहीत. या कारला यूज्ड कार मार्केटमध्ये 2.25 लाखात खरेदी करता येऊ शकते. 

 • here you can buy used cars on half price

  पोलो GT TSi 
  - प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटची सुरुवात एक प्रकारे पोलो जीटीने सुरु केली होती. TSi ही कार चाहत्यांची आवडती आहे. या कारमध्ये 7 स्पीड डीएसजी आहे. ज्यांना लुक आणि डिझाइनसोबत स्वस्त पेट्रोल कार खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पोलो एक चांगला पर्याय आहे. चांगल्या स्थितीतील यूज्ड कार 5.50 पर्यंत खरेदी करता येईल. 

 • here you can buy used cars on half price

  स्कॉर्पियो 
  - महिंद्राची दुसरी सर्वात पॉप्यूलर यूज्ड कार आहे स्कॉर्पियो. ही कार यूज्ड कार मार्केटमध्ये 5.50 लाखांपर्यंत खरेदी करता येते. 

 • here you can buy used cars on half price

  होंडा सिविक 
  - होंडा सिविक फक्त दिसायला शानदार नाही तर या कारचा परफॉर्मन्सही बेस्ट राहिला आहे. 1.8 लीटर इंजिन असलेली ही कार 172 एनएम टॉर्क जनरेट करते. यूज्ड कार मार्केटमध्ये 4 लाखांपर्यंत ही कार मिळते. 
   

Trending