Home | Business | Auto | In 2018, news swift, Brezza and other SUV would be launch

2018 मध्ये लॉंच होणार NEW Swift आणि Brezza, सर्वात स्वस्त SUV

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 03, 2018, 11:21 AM IST

मुंबई- फेब्रुवारी महिन्यात सुरु होणाऱ्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये अनेक कंपन्या नवीन कार आणि एसयुव्ही लॉंच करणार आहेत.

 • In 2018, news swift, Brezza and other SUV would be launch

  मुंबई- फेब्रुवारी महिन्यात सुरु होणाऱ्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये अनेक कंपन्या नवीन कार आणि एसयुव्ही लॉंच करणार आहेत. यात मारुतीसह महिंद्रा, डेटसन आणि अनेक कंपन्यांच्या कार सामिल आहेत. ६ दिवस चालणाऱ्या या एक्स्पोत ९ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ऑटो एक्स्पोत सर्वांच्या नजरा Datsun Go Cross नावाच्या स्वस्त एसयुव्हीवर असेल. इंडोनेशियात याची पहिली झलक बघायला मिळाली होती. आता ही कार भारतात लॉंच केली जाणार आहे.

  असे सांगितले जात आहे, की ऑटो एक्स्पोत लॉंच करण्यासह फेब्रुवारीत याचे सेलिंग सुरु होणार आहे. या एसयुव्हीचे मॉडेल मारुती नेक्साच्या बलेनो आणि टाटाच्या नेक्सनशी मिळते जुळते आहे. यात १.२ लीटरचे पॉवरफुल इंजिन बसवले आहे.

  या कारशी असेल टक्कर
  Datsun Go Cross भारतातील सर्वात स्वस्त एसयुव्ही असल्याचे सांगितले जात आहे. याची किंमत ४.५ लाख असू शकते. याचे टॉप मॉडेल ६.८ लाखांच्या जवळपास असेल. अशा वेळी मारुतीची सेलेरियो आणि महिंद्राची KUV 100 ला ही कार टक्कर देऊ शकते. सेलेरियो ५ लाख आणि KUV 100 सुमारे ५.५ लाख रुपयांपासून सुरु होते.

  पुढील स्लाईडवर वाचा, २०१८ मध्ये कोणकोणत्या कार होणार आहोत लॉंच... वाचा फिचर्स...

 • In 2018, news swift, Brezza and other SUV would be launch

  Mahindra U321 MPV

  भारतीय बाजारपेठेत महिंद्राने वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. या वर्षी महिंद्रा ही कंपनी U321 MPV लॉंच करणार आहे. ही ७ किंवा ८ सीटर MPV असेल. ही Xylo ची रिप्लेसमेंट असू शकते. यात ४ सिलिंडर असलेले 1.6 लिटरचे डिझेल इंजिन आहे. किंमत १० लाखांच्या घरात राहण्याची शक्यता आहे. टॉप मॉडेल १५ लाखांच्या घरात असेल.

 • In 2018, news swift, Brezza and other SUV would be launch

  Maruti Suzuki Swift 2018

  मारुतीचे सर्वात यशस्वी कार स्विफ्ट २०१८ आणखी स्टायलिश होणार आहे. नेक्स्ट जनरेशन स्विफ्टमध्ये १.२ लिटर पेट्रोल आणि १.३ लिटर डिझेल इंजिन असेल. मॅन्युअल आणि ऑटो दोन्ही मॉडेलमध्ये ही कार सादर होऊ शकते. २०१८ च्या ऑटो एक्स्पोत ही कार लॉंच केली जाऊ शकते. याची एक्स-शोरूम प्राइस 4.5 लाखांपासून 6.5 लाखांवर राहू शकते.

 • In 2018, news swift, Brezza and other SUV would be launch

  Tata Nexon AMT

  टाटा मोटर्सने गेल्या वर्षी नेक्सन लॉंच केली आहे. मारुतीची व्हिटारा ब्रिझा आणि फोर्ड इकोस्पोर्ट याच्याशी तिची स्पर्धा आहे. २०१८ मध्ये या कारला एसयुव्ही अवतार दिला जाणार आहे. या कारला नवीन कलर आणि डिझाईनसह लॉंच केले जाणार आहे. सध्या या कारची एक्स-शोरूम प्राइस 5.85 लाखांपासून 9.44 लाखांवर राहण्याची शक्यता आहे.

 • In 2018, news swift, Brezza and other SUV would be launch

  Maruti Ertiga 2018

  मारुतीची ७ सीटर इर्टिगा २०१८ मध्ये नवीन लुकसह लॉंच होणार आहे. या कारचे स्पोर्ट्स व्हेरायंट लॉंच केले जाणार आहे. इंटेरिअरही नवीन स्वरुपात आणले जाणार आहे. या कारची एक्स-शोरूम प्राइस 6.20 लाख रुपयांपासून सुरु होते.

 • In 2018, news swift, Brezza and other SUV would be launch

  Maruti Suzuki S-Cross Petrol

  मारुती आणि नेक्साच्या कॉम्बिनेशनने तयार झालेली S-Cross चे २०१८ मध्ये पेट्रोल व्हर्जन लॉंच केले जाईल. सध्या ही कार डिझेल व्हेरायंटमध्ये आहे. मारुतीच्या सक्सेस गाडीत तिची गणती होते. या कारची एक्स-शोरूम प्राइस 8.02 लाखांपासून सुरु होते. अशा वेळी पेट्रोल व्हेरायंंट आली तर किंमत १ लाख रुपयांनी वाढू शकते. या कारमध्ये 1.3 लिटरचे डिझेल इंजन बसविले आहे. या कारला 1.4 लिटरच्या डिझेल व्हेरायंटसह लॉंच केले जाईल.

 • In 2018, news swift, Brezza and other SUV would be launch

  Maruti Suzuki Vitara Brezza Petrol

  मारुती S-Cross प्रमाणेच व्हिटारा

  ब्रिझा पेट्रोल व्हेरायंटमध्ये लॉंच केली जाणार आहे. मारुतीच्या टॉप मॉडेल एसयुव्हीत हिचा समावेश होतो. याची एक्स-शोरूम प्राइस 8.17 लाखांपासून सुरु होते.

Trending