Home | Business | Auto | Bajaj Avenger 2018 Street 180cc Launched At Rs 83,475

Bajaj ने लाँच केली 180cc पॉवरफुल क्रुझर बाईक, किंमत ऐकून बसेल धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 23, 2018, 04:15 PM IST

बजाजने आपली नवी क्रुझर बाईक Avenger Street 180 ऑफिशियली लाँच केली आहे. याची एक्स-शोरुम (महाराष्ट्र) प्राइस 83,475 रूपये

 • Bajaj Avenger 2018 Street 180cc Launched At Rs 83,475

  युटिलिटी डेस्क- बजाजने आपली नवी क्रुझर बाईक Avenger Street 180 ऑफिशियली लाँच केली आहे. याची एक्स-शोरुम (महाराष्ट्र) प्राइस 83,475 रूपये आहे. असे मानले जाते की, कंपनीने या क्रुझर बाइकला Avenger Street 150 ला रिप्लेस केले आहे. या बाईकमध्ये नविन हॅडलॅंप आणि ग्राफिक्स मिळेल. यामध्ये 180cc चे इंजिन असले तरीही जुने मॉडल (150cc) च्या फक्त 3000 रूपये जास्त किंमत असेल. 2017 मध्ये अॅव्हेंजर 150cc आणि 220cc चे मॉडल लाँच केले होते.


  # मेटल ब्लॅक अलॉय व्हील
  या क्रुझर बाईकमध्ये मेटल ब्लॅक अलॉय व्हील मिळेल. जे अॅल्युमिनियम फिनिशिंगसोबत येईल. यासोबतच बाईकमध्ये ट्यूबलेस टायर दिले आहे. म्हणजे कच्चे आणि डोंगरी रस्त्यावरही तुम्ही या बाईकला घेऊन जाऊ शकतात. एकूनच ही सर्व रस्त्यांसाठी पूर्णपणे कम्फर्ट आहे.

  # 180cc चे दमदार इंजिन
  नविन अॅव्हेंजरमध्ये 180cc चे दमदार इंजिन दिले आहे. जे 15.5hp वर 8,500rpm आणि 13.7Nm टॉर्कवर 6,500rpm जनरेट करते. बाईकमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स मिळेल. बाइकला कंट्रोल करण्यासाठी फ्रंटला 260mm चे डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रम ब्रेक दिले आहे. मात्र, कंपनीने ABS फीचर दिलेले नाही. बाइकमध्ये 13 लीटरचे मोठे पेट्रोल टॅंक दिले आहे. या क्रुजरचे वजन 150kg आहे. तसेच, हे दोन कलर Ebony ब्लॅक आणि स्पायसी रेड मध्ये लाँच केले आहे.

  पुढील स्लाइडवर पाहा Bajaj Avenger Street 180cc चे फोटोज..

 • Bajaj Avenger 2018 Street 180cc Launched At Rs 83,475

Trending