Home | Business | Auto | these are stylish car in 5 to 6 lack rupees in 2018

5 ते 6 लाख बजेट असेल तर 2018 मध्ये खरेदी करा या स्टायलिश कार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 03, 2018, 03:34 PM IST

मुंबई- हॅचबॅक सेगमेंट इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत नेहमीच पॉप्युलर राहिले आहे. संपूर्ण इंडस्ट्रीत या सेगमेंटची भागिदारी ५

 • these are stylish car in 5 to 6 lack rupees in 2018

  मुंबई- हॅचबॅक सेगमेंट इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत नेहमीच पॉप्युलर राहिले आहे. संपूर्ण इंडस्ट्रीत या सेगमेंटची भागिदारी ५० टक्के आहे. त्यामुळे कार कंपन्या प्रत्येक वर्षी या सेगमेंटमध्ये नवनवीन मॉडेल्स लॉंच करीत असतात. २०१८ मध्ये कार कंपन्या ५ ते ६ लाख रुपयांच्या सेगमेंटमध्ये नवीन कार आणणार आहेत. आज आम्ही तुम्हाला या कारची माहिती देणार आहोत.

  मारुती सुझुकी स्विफ्ट २०१८
  मारुतीने नवीन स्विफ्टचे प्रोडक्शन पूर्ण केले आहे. याची प्रोडक्ट इमेज इंटरनेटवरही लिक झाली आहे. ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये सादर केल्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये ही कार लॉंच केली जाणार आहे. या शिवाय पेट्रोल आणि डिझेल व्हेरायंट ऑटोमॅटिक व्हर्जनसह स्विफ्ट स्पोर्ट्स ही कारही लॉंच केली जाणार आहे. त्यानंतर ही कार भारतात येईल.

  सुरवातीला मारुती स्विफ्टच्या १.२ लिटर पेट्रोल आणि १.३ लिटर डिझेल व्हेरायंट लॉंच करेल. स्विफ्ट स्पोर्ट्सला काही दिवसांनी लॉंच केले जाणार आहे. नावावरुन जे चित्र तयार होते त्याप्रमाणे ही कार स्पोर्टी लुक आणि स्पोर्टी टेक्नॉलॉजीसह सादर केली जाणार आहे. कार अॅण्ड बाईक नुसार, या कारमध्ये १.४ लिटर टर्बोचार्ज्ड, ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे जे १४० पीएस पॉवर आणि २३० एनएम टॉर्क जनरेट करते. यात ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहेत.

  अंदाजे किंमत: 4.99 लाखांपासून 7.99 लाखांपर्यंत.

  या आहेत 5 ते 6 लाख बजेटमधील स्लायलिश कार... पुढील स्लाईडवर करा खरेदी...

 • these are stylish car in 5 to 6 lack rupees in 2018

  ह्युंदाई आय२० फेसलिफ्ट

   

  ह्युंदाईने आय२० सेकंड जनरेशन फेसलिफ्ट व्हर्जनचे टेस्टिंग भारतात सुरु केले आहे. या कारच्या इंटेरिअर आणि एक्सटेरिअर अशा दोन्हीत बदल करण्यात आले आहेत. पहिल्या क्वॉर्टरमध्ये ही कार लॉंच केली जाणार आहे.

   

  अंदाजे किंमतया कारची किंमत ५.५ लाख रुपयांपासून ९.५ लाख रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

 • these are stylish car in 5 to 6 lack rupees in 2018

  फोर्ड फि‍गो क्रॉस

   

  फोर्ड गेल्या काही दिवसांपासून हॅचबॅक फिगोच्या क्रॉसओव्हर व्हर्जनवर काम करत आहे. आता या कारची टेस्ट होताना दिसली आहे. हिच्या फ्रंट आणि रियर बंपरमध्ये बदल करण्यात आला आहे. फिगो क्रॉस व्यतिरिक्त फिगो आणि एस्पायर फेसलिफ्ट व्हर्जन लॉंच केली जाणार आहे. फिगो क्रॉसला २०१८ च्या मध्यंतरी लॉंच करण्यात येण्याची शक्यता आहे.

   

  अंदाजे किंमत: 5 लाखांपासून 8 लाखांपर्यंत.

 • these are stylish car in 5 to 6 lack rupees in 2018

  गो क्रॉस

   

  डॅटसन ही कंपनी २०१८ च्या सुरवातीला गो क्रॉस कनसेप्ट सादर केली जाणार आहे. गो प्लसच्या आधारावर ही कार सादर करण्यात आली आहे.

   

  अंदाजे किंमत: 6 लाखांपासून 8 लाखांपर्यंत.

 • these are stylish car in 5 to 6 lack rupees in 2018

  रेडी गो एएमटी

   

  डॅटसन इंडिया रेडी-गोचे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) व्हर्जन सादर करण्यात आले आहे. यावर बऱ्याच दिवसांपासून काम सुरु होते. याचे इंजिन ६७ बीएचपी पॉवर आणि ९१ एसएम टॉर्क जनरेट करते.

   

  अंदाजे किंमत4 लाखांपासून 5 लाखांवर.

Trending