आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजची हॅटट्रिक ऑफर : बाईक्सवर 1 वर्षांचा इन्श्युअरन्स फ्री, 2 वर्ष फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षे Warranty

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - आगामी काळात बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी बजाजने एक खास भेट आणली आहे. बजाजने बाईक्स विक्रीसाठी हॅटट्रिक ऑफर काढली आहे. या ऑफरनुसार बजाज त्यांच्या बाइक्सवर तीन प्रकारच्या खास ऑफर्स देत आहे. यात फ्री इन्श्युरन्स, फ्री सर्व्हीस आणि वॉरंटीचा समावेश आहे. बजाजच्या हॅटट्रिक ऑफरमध्ये 1 वर्षाचा फ्री इन्श्युरन्स, 2 वर्षांची फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षांची वॉरंटी असेल. 
 
या बाइक्सवर इन्श्युरन्स 
या ऑफरमध्ये बजाज पल्‍सर 150 बाईकवर 1 वर्षाचे फ्री इंश्युरन्स, पल्सर 160, V, डिस्‍कव्हर आणि प्लॅटिना या मोटरसायकल्‍सचा समावेश आहे. सर्व बाईक्सवर ही ऑफर नाही. मात्र 2 वर्षे फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षे वॉरंटी सर्व बाइक्सवर उपलब्ध असेल. 
 
31 जुलैपर्यंत संधी 
बजाजची हॅटट्रिक ऑफर 1 जुलैपासून सुरू झाली आहे. म्हणजे तुम्ही जवळच्या शोरूममध्ये याचा लाभ घेऊ शकता. 31 जुलै 2018 पर्यंत ही ऑफर लागू असेल. बजाज याशिवाय कमी व्याजदर आणि कमी डाऊनपेमेंटची सुविधाही दिली जात आहे. 
 
बजाज बाईक्सच्या किमती.. 
पल्‍सर 150- 64,141 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)
डिस्‍कव्हर- 51,174 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)
प्‍लॅटिना- 47,155 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)
V- 58,458 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)
CT 100- 30,174 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)
 
 

बातम्या आणखी आहेत...