Home | Business | Auto | buy these 5 budget cars before 31st December

नवीन वर्षापूर्वी खरेदी करा या 5 बजेट कार, नंतर किंमत वाढण्याची शक्यता

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 28, 2017, 02:25 PM IST

रेनोची सर्वात स्वस्त असलेल्या क्विड कारची मागणी दिवसेंदिवस वाढतेय. स्मॉल कार मार्केटमध्ये आल्टोनंतर क्विडचा क्रमांक येतो

 • buy these 5 budget cars before 31st December

  मुंबई - नवीन वर्षापूर्वी बाजारपेठांत कारच्या खरेदीमध्ये तेजी बघायला मिळते. यानिमित्त कार कंपन्या अनेक डिस्काऊंट ऑफरही घेऊन येतात. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. तुमचे बजेट कमी असेल, मात्र तुम्हाला कार खरेदी करावयाची असल्यास तुमच्याकडे या पाच कारचे चांगले पर्याय आहेत. कार कंपन्यांनी तीन लाखापेक्षा कमी बजेटच्या स्मॉल कार बाजारात सादर केल्या आहेत.

  रेनो क्विड
  रेनोची सर्वात स्वस्त असलेल्या क्विड कारची मागणी दिवसेंदिवस वाढतेय. स्मॉल कार मार्केटमध्ये आल्टोनंतर क्विडचा क्रमांक येतो. क्विड चार वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे.

  स्पेसिफिकेशन
  किंमत : 2.61 लाखापासून सुरुवात
  इंजिन : 799 सीसी
  पावर : 54 पीएस
  माइलेज : 25.17 कि‍मी प्रति लीटर


  पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत आणखी कार

 • buy these 5 budget cars before 31st December

  आल्टो 800
   
  मारुती सुझुकी इंडियाची आल्टो 800 ही सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. मात्र, ऑगस्ट 2017 मध्ये कार सेल्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
   
  किंमत : 2.45 लाखापासून पुढे
  इंजिन : 796 सीसी    
  पावर : 48 पीएस     
  माइलेज : 24.7 कि‍मी प्रति लीटर (पेट्रोल), 33.44 कि‍मी प्रति कि‍लोग्राम (सीएनजी)

 • buy these 5 budget cars before 31st December

  रेडी - गो
   
  स्मॉल हॅचबॅक सेगमेंटमध्ये रेडी गो या कारलाही आता चांगली मागणी आहे.
   
  किंमत : 2.41 लाखापासून पुढे
  इंजिन : 799 सीसी  
  पावर : 54 पीएस  
  माइलेज : 25.17 कि‍मी प्रति लीटर

 • buy these 5 budget cars before 31st December

  ओमनी
   
  मारुती सुझुकीची एकमेव मल्टीपर्पज व्हेईकल सेगमेंटमध्ये ओमनी प्रसिद्ध आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये या कारचा समावेश होतो.
   
  किंमत : 2.65 लाखापासून पुढे
  इंजिन : 796 सीसी  
  पावर : 34.7 पीएस  
  माइलेज : 16.8 कि‍मी प्रति लीटर

 • buy these 5 budget cars before 31st December

  टाटा नॅनो


  टाटाने देशातील सर्वाधिक स्वस्त कार नॅनोला लाँच केले. मात्र, या कारला भारतात यश मिळाले नाही. यामध्ये जेन नेक्स्ट नॅनोला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
   
  किंमत : 2.25 लाखापासून पुढे
  इंजिन : 624 सीसी  
  पावर : 38 पीएस  
  माइलेज : 21.9 कि‍मी प्रति लीटर

Trending