Home | Business | Auto | In 2017, car companies stopped production of these cars

2017 मध्ये या भारतीय कार्सचे भवितव्य आले संपुष्टात, ही आहे लिस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 27, 2017, 01:51 PM IST

मुंबई- प्रत्येक वर्षी असे होते, की कारचे काही मॉडेल्स हिट होतात तर काही फ्लॉप. २०१७ मध्ये असेच काहीसे झाले.

 • In 2017, car companies stopped production of these cars

  मुंबई- प्रत्येक वर्षी असे होते, की कारचे काही मॉडेल्स हिट होतात तर काही फ्लॉप. २०१७ मध्ये असेच काहीसे झाले. अशा अनेक कार राहिल्या ज्यांचा भारतातील प्रवास बंद झाला. याच्या मागे त्यांचा घटता सेल आणि दुसऱ्या आकर्षक कारचे लॉंचिंग राहिले. मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई मोटर, रेनो, महिंद्रा आदी कंपन्यांनी काही मॉडेल्सचे प्रोडक्शन बंद केले आहे.

  मारुती सुझुकी रिट्ज
  देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) पॉप्युलर हॅचबॅक कारमधील एक रिट्जची विक्री डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये बंद केली होती. २००९ मध्ये लॉंच झालेल्या रिट्जचे (पेट्रोल आणि डीझेल) सुमारे ४ लाख युनिट्स विकले गेले होते.

  मारुती कंपनीच्या प्रवक्त्याने हे खरे असल्याचे सांगून म्हटले, की प्रोडक्ट पोर्टफोलियोत आम्ही कायम बदल करत असतो. त्याचा निरंतर रिव्ह्यू घेतला जातो. त्यानुसार नवीन मॉडेल्स लॉंच केले जातात. असे असले तरी पुढील १० वर्षे बंद झालेल्या कारचे स्पेअरपार्टस् आणि सर्व्हिस मिळत राहिल.

  पुढील स्लाईडवर वाचा, २०१७ मध्ये या बहुचर्चित कार झाल्या बंद...

 • In 2017, car companies stopped production of these cars

  होंडा मोबिलियो
  जपानी कार कंपनी होंडाने मल्टीपर्पज व्हेईकल (एमवीपी) मोबिलियोची भारतात विक्री बंद केली आहे. याचे लॉंचिंग ३१ महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. आता याचे प्रोडक्शन बंद करण्यात आले आहे. डिमांड घटल्याने याचे प्रोडक्शन बंद करण्यात आले.

 • In 2017, car companies stopped production of these cars

  रेनोच्या अनेक कार बंद
  रेनो इंडियाचे सीईओ आणि एमडी सुमित सहानी यांनी एका मुलाखतीत सांगितले, होते की आम्ही भारतात सहा वर्षांपूर्वी पाऊल ठेवले होते. सध्या आमच्या पोर्टफोलियोत क्विड, डस्टर, लॉजी आणि कॅप्चर या कार आहेत. आमचा पोर्टफोलियो आम्ही सातत्याने रिव्हाईज करतोय. प्रत्येक वर्षी एक कार लॉंच करुन पोर्टफोलियो वाढवतोय.

   

  कंपनीने रेनो पल्स, रेनो स्काला, रेनो Fluence, रेनो Koleos या कारचे प्रोडक्शन बंद केले आहे. यातील काही कारचे केवळ काहीच युनिट्स विकले गेले होते. 

 • In 2017, car companies stopped production of these cars

  ह्युंदाई सॅंटा फे
  ह्युंदाईने भारतात सादर केलेली सात सीटर कार सेंटा फे बंद केली आहे. ऑफिशिअल वेबसाईटवरुनही ही कार काढण्यात आली आहे. सेल्स कमी असल्याने ही कार बंद केली आहे. टोयोटो फॉर्च्युनर, फोर्ड एंडेव्हर या कारच्या तुलनेत या कारची किंमत जास्त होती.

 • In 2017, car companies stopped production of these cars

  महिंद्रा स्कॉर्पियो
  महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या प्रवक्त्याने होकार देत सांगितले, की स्कॉर्पियो लॉंच केली तेव्हा तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ऑटोमेशन ट्रान्समिशनला तिने पुढच्या पातळीवर नेले. पण आता सेल्स कमी झाली आहे. त्यामुळे प्रोडक्शन बंद करण्यात आले आहे. आता याचेे ऑटोमॅटिक व्हेरायंट बाजारपेठेत आणले आहे. २०१५ मध्ये ते लॉंच करण्यात आले. त्याची किंमत १३.१३ ते १४.३३ लाख आहे. 

 • In 2017, car companies stopped production of these cars

  शेवरले
  जनरल मोटर्सने घोषणा केली होती, की या वर्षीपासून भारतात कारची विक्री बंद केली जाईल. ३१ डिसेंबर २०१७ नंतर या कार विकल्या जाणार नाही. भारतातील ब्रांड शेवरोले कारचे केवळ एक्सपोर्ट करेल.

   

  शेवरोले बीट, तवेरा, शेवरोले क्रूज, सेल सेडान, शेवरले ट्रेलब्‍लेजर या कार जनरल मोटर्सने शेवरोलेच्या बॅनरखाली आणल्या होत्या.

Trending