Home | Business | Auto | Cheapest Harley Davidson Iron 883 In Delhi Auto Market

8 लाखाची हार्ले डेव्हिडसन फक्त 3 लाखात, हे आहे भारतातील सर्वात स्वस्त बाईक मार्केट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 17, 2018, 01:10 PM IST

महागड्या बाईक घेण्याची सर्वांची इच्छा असते, पण यांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. यासारख्या बाईकची किंमत जवळपा

 • Cheapest Harley Davidson Iron 883 In Delhi Auto Market

  युटिलीटी डेस्क:- महागड्या बाईक घेण्याची सर्वांची इच्छा असते, पण यांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. अशा बाईकची किंमत जवळपास 2 लाख ते 50 लाखांपर्यंत असते. भारतीय बाजारांमध्ये प्रिमियम कॅटेगरींच्या बाईकला अधिक पसंत केले जाते. त्यामध्ये हार्ले डेव्हिडसनचे नाव सामिल आहे. या कंपनीच्या बाईकची किंमत जवळपास 5 लाख रुपयांपासून सुरू होते. पण भारतात अशी एक जागा आहे की तेथे निम्म्याहून कमी किंमतीत बाईक खरेदी केली जाऊ शकते.

  येथे आहे हे मार्केट
  दिल्लीमध्ये सेकंड हॅंड बाईकचे सर्वात मोठे मार्केट आहे. करोलबागमध्ये आपल्याला सर्व कंपनीच्या बाईक मिळेल. यामध्ये बाजाजपासून ते डुकाटी, रॉयल इनफील्ड, हार्ले डेव्हिसनसारख्या माहागड्या बाइक कमी किंमतीत मिळतात. Harley Davidson Iron 883 ची भारतात एक्स-शोरुम प्राइस 8 लाख रुपये आहे. पण या मार्केटमध्ये जवळपास 3 लाखात खरेदी केली जाऊ शकते.

  उत्तम स्थितीतील बाईक..
  करोल बागमध्ये सेकंड हॅंड बाईकचे सर्वात मोठे मार्केट आहे. काही बाईक तर लेटेस्ट मॉडेच्याही असतात. तर काही 1000 किलोमिटरहूनही कमी धावलेल्या असतात. येथील अनेक डिलर्स तर बाईकसोबत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही देतात. सोबतच 6 महीने किंवा वर्षभर वारंटी देतात.

  या गोष्टींकडे असू द्या लक्ष...
  आपण या मार्केटमध्ये बाईक खरेदी करायला जाणार आहात तर या गोष्टींकडे लक्ष असु द्या. बाईकच्या सर्व पार्टचे ज्ञान असने गरजेचे आहे. कारण, बाईकचे इंजीन खराब असु शकते नाहीतर एखादा पार्ट नकली असु शकतो. अशामध्ये आवश्यक आहे की, आपण कोणत्या बाईक एक्सपर्ट किंवा मॅकेनिकला सोबत घेऊन जातात.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या Harley Davidson Iron 883 चे फिचर्सबद्दल...

  (नोट : बातमीत दाखवलेल्या किंमतीपेक्षा मार्केटमध्ये किंमत कमी-जास्त असु शकते. सोबतच जी किंमत दाखवली जात आहे. त्यापेक्षाही कमी किंमतीवरही आपण बार्गेनिंग करु शकतात.)

 • Cheapest Harley Davidson Iron 883 In Delhi Auto Market
 • Cheapest Harley Davidson Iron 883 In Delhi Auto Market
 • Cheapest Harley Davidson Iron 883 In Delhi Auto Market
 • Cheapest Harley Davidson Iron 883 In Delhi Auto Market
 • Cheapest Harley Davidson Iron 883 In Delhi Auto Market

Trending